शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

मुलांनो इकडे लक्ष द्या; कोरोनामुळे यंदा दोन नव्हे एकच मिळणार गणवेश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 12:55 PM

माढा तालुका : १३ हजार ७०० शाळकऱ्यांसाठी शासनाकडून ४१ लाखांचा निधी

कुर्डूवाडी : शालेय विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत वर्षभरासाठी दोन गणवेश दिले जातात. यंदा एकच गणवेश मिळणार आहे. यासाठी माढा तालुक्यातील २२ केंद्रातील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी  ४१ लाख १० हजार रुपयांचा निधी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या खात्यावर  उपलब्ध झाला आहे. १३ हजार ७०० लाभार्थी विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा ह्या खूप उशिराने सुरू झाल्या आहेत. त्यातही प्राथमिकचे काही वर्ग अद्यापही भरलेले नाहीत. परंतु ग्रामीण व शहरी भागातील जिल्हा परिषदेच्या व नगरपालिकेच्या इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व शाळांना दरवर्षी शासन सर्व जातींच्या मुली, अनुसूचित जाती मुले, अनुसूचित जमाती मुले व दारिद्र्य रेषेखालील मुलांना दोन गणवेशासाठी ६०० रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असते.  यंदा कोरोनाची परिस्थिती असल्याने व उशिराने शाळा सुरू झाल्याने शासनाने एकाच गणवेशासाठी शालेय व्यवस्थापनाकडील खात्यावर अनुदान पाठविलेले आहे. ते येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या खात्यावर जमा देखील झाले असल्याचे गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी सांगितले.

याबाबत येथील तालुका स्तरावर सभापती विक्रमसिंह शिंदे, उपसभापती धनाजी जवळगे, गटविकास अधिकारी डॉ संताजी पाटील व गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांच्या समवेत तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांची बैठक पार पडली. गणवेशाबाबत कार्यवाही सुरू झाली आहे.

संबधित लाभार्थी सोडून तालुक्यात खुल्या वर्गातील, ओबीसी प्रवर्गातील, एसबीसी व व्हीजेएनटी  वर्गातील ६ हजार ९३९  विद्यार्थी आहेत. त्यांनाही  दरवर्षी प्रमाणे  लोकसभागातून एक गणवेश देणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी फडके यांनी यावेळी सांगितले. 

कोरोनामुळे शाळा बंद असलेल्या शाळा सुरु झाल्या मात्र गणवेष मिळणार की नाही याबद्दल सांशकता व्यक्त होत असताना आता एक काह होईना गणवेश मिळणार असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हासू विलसले आहे.

असे आहेत लाभार्थी - माढा तालुक्यात सापटणे (भो),माढा, दारफळ, उपळाई (बु), अंजनगाव (खे), मानेगाव, कुर्डू, म्हैसगाव, बारलोणी, कव्हे, रोपळे, मोडनिंब, अरण, लऊळ, परिते, वरवडे, उजनीनगर, आढेगाव, बेंबळे, पिंपळनेर, निमगाव (टे) व नगरपरिषद कुर्डूवाडी अशी एकूण २२ केंद्रे आहेत.  त्यामध्ये लाभार्थी मुलींची संख्या ही ९ हजार ९८८, अनुसूचित जाती मुले १ हजार ७७१ तर अनुसूचित जमाती मुलांची संख्या  १३६ तर दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांची संख्या १ हजार ८०५ अशा प्रकारे एकूण लाभार्थी विद्यार्थी संख्या ही १३ हजार ७०० इतकी आहे. त्यांना आता एक गणवेश लवकरच मिळणार आहे.

शासन स्तरावरून यंदा माढा तालुक्यातील १३ हजार ७०० लाभार्थी विद्यार्थ्यांना  गणवेशासाठी ४१ लाख १० हजार रुपयांचे निधी प्राप्त झाला आहे. लवकरच त्यांंना गणवेश मिळेल. - मारुती फडके, गटशिक्षणाधिकारी,माढा

 

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षण