'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 00:39 IST2025-07-06T00:38:24+5:302025-07-06T00:39:24+5:30

...तत्पूर्वी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्याच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात फुगडीचा फेर धरला. 

Chief Minister Devendra Fadnavis and Amruta Fadnavis held a fugadi to the tune of 'Gyanoba Mauli Tukaram' | 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 

'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 

आप्पासाहेब पाटील -

सोलापूर : आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात होत आहे. पंढरपूरच्या विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी देवेंद्र फडणवीस आज सहकुटुंब पंढरपुरात दाखल झाले आहेत. तत्पूर्वी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्याच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी  'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात फुगडीचा फेर धरला. 

या दाम्पतत्यांनी फुगडी खेळून पंढरपूरच्या वातावरणात एक वेगळा उत्साह आणलाआहे. शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपुरात दाखल झाले असून, ही पूजा परंपरेनुसार पार पडणार आहे. पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे, जिथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे पंढरपूरमधील वातावरण भक्तीमय झाले आहे. अमृता फडणवीस यांनी खेळलेली फुगडी ही एक पारंपरिक खेळ असून, यामुळे स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे शासकीय महापूजेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या पंढरपूर शहरात राज्यातील आठ ते दहा मंत्री आले आहेत.

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis and Amruta Fadnavis held a fugadi to the tune of 'Gyanoba Mauli Tukaram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.