पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

By आप्पासाहेब पाटील | Updated: June 20, 2025 13:54 IST2025-06-20T13:53:14+5:302025-06-20T13:54:05+5:30

Pandharpur Wari Latest News: विठू माऊलीच्या दर्शनासाठी आलेला तरुण सकाळी चंद्रभागेत स्नानासाठी उतरला होता. तो परत बाहेर आलाच नाही.

Chandrabhaga river in Pandharpur floods, one devotee drowns in river | पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

- आप्पासाहेब पाटील, सोलापूर 
पंढरपुरात पुराची परिस्थिती निर्माण होत असताना शुक्रवारी चंद्रभागा नदीत एक दुर्घटना घडली. पुंडलिक मंदिराजवळ चंद्रभागा नदीत बुडून बेळगाव येथील शुभम पावले (वय 27) या तरुणाचा मृत्यू झाला. आणखी काही वारकरी भाविक पुराच्या पाण्यात पाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आषाढी यात्रेवर महापुराचे सावट निर्माण  आहे. उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे प्रशासनाने भाविकांना सतर्कतेचा इशारा गुरूवारी दिला होता. 

बेळगावच्या तरुणाचा पंढरपुरात मृत्यू

मिळालेली प्राथमिक माहितीनुसार, आषाढी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी होत आहे. शुक्रवारी (२० जून) सकाळी सातच्या दरम्यान चंद्रभागा नदीत भक्त पुंडलिक मंदिराजवळ बुडून बेळगाव येथील शुभम पावले या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

वाचा >>कुठे कमरेपर्यंत पाणी तर, कुठे दरड कोसळली; मान्सूनने महाराष्ट्र व्यापला!

मित्रांसोबत तो विठुरायाच्या दर्शनासाठी आला होता. सकाळी नदीमध्ये अंघोळीला गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. तब्बल चार तासांच्या शोध कार्यानंतर शुभमचा मृतदेह मिळाला. 

या घटनेनंतर पंढरपूर पेालीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील शोधकार्य व माहिती घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.

Web Title: Chandrabhaga river in Pandharpur floods, one devotee drowns in river