शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

केंद्रीय पथकाचा दुष्काळी दौरा ; अधिकारी नुसते येत्यात अन् जात्यात पदरात कायबी नाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 2:54 PM

करमाळा : अधिकारी नुसते येत्यात..कसला तरी सर्व्हे करत्यात, अन् निघून जात्यात... आमच्या  पदरात काहीच पडत नाही. मागच्या येळची  कर्जमाफी ...

ठळक मुद्देकरमाळा तालुक्यात पडलेल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रातील अधिकारीकरमाळा  तालुक्यातील जातेगाव शिवारातून दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीस सुरूवातदुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या  पथकाने कामाणे येथे पाण्याअभावी जळून गेलेल्या लिंबूच्या बागेची पाहणी केली

करमाळा : अधिकारी नुसते येत्यात..कसला तरी सर्व्हे करत्यात, अन् निघून जात्यात... आमच्या  पदरात काहीच पडत नाही. मागच्या येळची  कर्जमाफी सुद्धा मिळाली नाही बघा. बँक व सावकाराच्या कर्जासाठी तोंड लपवावं लागतंय आता ..औषध प्यायची पाळी आलीय बघा.. असे निराशेचे बोल आज करमाळा तालुक्यातील जातेगाव येथे दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर जातेगावचे शेतकरी किसन मारूती वारे यांनी सुनावले.

करमाळा तालुक्यात पडलेल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रातील अधिकारी सुभाषचंद्र मीना, एम.जी.टेंभुर्णे व विजय ठाकरे या तीन जणांच्या पथकाने आज सायंकाळी साडेपाच वाजता अहमदनगर व सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या करमाळा  तालुक्यातील जातेगाव शिवारातून दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीस सुरूवात केली. पथकाने जातेगाव येथील किसन मारूती वारे यांच्या दोन एकरातील जळालेल्या कापसाच्या पिकाची पाहणी केली. त्यानंतर जातेगाव येथेच दत्तात्रय मोरे या शेतकºयांच्या शेतात जाऊन पाहणी केली. दत्तात्रय मोरे याने चार एकरात तुरीचे पीक घेतले होते पावसाअभावी वाढ खुंटल्याने तूर कापून जनावरांना घातली असे या शेतकºयाने पथकातील अधिकाºयांना सांगितले.

दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या  पथकाने कामाणे येथे पाण्याअभावी जळून गेलेल्या लिंबूच्या बागेची पाहणी केली. बिटरगाव-श्री गावात ग्रामस्थ पथकाची वाट पाहत होते पण दुष्काळी पाहणी पथक थेट पोथरेमार्गे करमाळ्याजवळ असलेल्या रोसेवाडी येथे आले. तेथे गावातील ग्रामस्थांबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची समस्या जाणून घेत अंधारातच  पाणीपुरवठा करणाºया विहिरीची पाहणी केली व  दुष्काळी पथक पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. 

पथकांसमवेत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर, उपजिल्हाधिकारी शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, प्रांताधिकारी मारूती बोरकर, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर,गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, तालुका कृषी अधिकारी संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, जातेगावचे माजी सरपंच संतोष वारे यांच्यासह पाणीपुरवठा, कृषी, जिल्हा परिषद, पंचायत समिती या  विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

क्षणचित्रे..- केंद्रातून दुष्काळ पाहणीसाठी आलेले पथक अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून सायंकाळी साडेपाच वाजता करमाळा तालुक्यात जातेगाव येथे दाखल झाले.- पथकाने कामोणे व बिटरगाव येथील शिवेवरील  पावसाअभावी जळालेल्या लिंबूच्या बागेची पाहणी केली. बिटरगाव-श्री येथे पथकाची ग्र्रामस्थ वाट पाहत होते, मात्र पथक बिटरगाव-श्री गावात गेलेच नाही.४रोसेवाडी येथे पथकाने अंधारात ग्रामस्थांबरोबर पिण्याच्या पिण्याच्या टंचाईची समस्या जाणून घेतली व पाणीपुरवठा करणाºया विहिरीची पाहणी केली.

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार