पंढरपुरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाला लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 06:30 IST2018-12-05T06:29:16+5:302018-12-05T06:30:47+5:30
पंढरपूर : शहरातील महत्त्वाच्या चौकात असणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया ला मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये ...

पंढरपुरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाला लागली आग
पंढरपूर : शहरातील महत्त्वाच्या चौकात असणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया ला मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसमोरील असणाऱ्या दोन मजली इमारती मध्ये दुसऱ्या मजल्यावर सेंट्रल बँक आहे. व पहिल्या मजल्यावर अनेक व्यवसायिक दुकाने आहेत. बँकेच्या बरोबर खाली कपडे शिवणकाम करणाऱ्या टेलर चे दुकान आहे. या दुकानात अचानक अज्ञात कारणाने आग लागली. या आगीने विश्वरूप घेतले यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडिया व बाजूचे शेतीचे बी बियाणे विक्रीच्या दुकानाला देखील आग लागली.
ही माहिती पंढरपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला समजताच अग्निशमन ची गाडी घटनास्थळी तत्काळ पोहोचली. यानंतर आग आटोक्यात आली. याबाबत पोलिस ठाण्यास उशीरा माहिती देण्यात आली.