कोल्हापूर : चंदेरी दुनियेची भुरळ सगळ्यांनाच पडते. पडद्यावर दिसणारे तारे-तारका प्रत्यक्षात कसे दिसतात, कसे बोलतात याविषयी आकर्षण वाटणे साहजिक असते. युवकांची हीच आवड ओळखून तरुणांसाठी ‘लोकमत युवा नेक्स्ट’च्या वतीने खास ‘गप्पाटप्पा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी चित्रपट ‘रेग’ची संपूर्ण टीम कोल्हापुरातील दोन महाविद्यालयांना भेट देणार असून, त्यांच्याशी आमने-सामने गप्पा मारण्याची संधी यावेळी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ही टीम बुधवारी (दि. ६) सकाळी ११.३० वाजता महावीर कॉलेज, तर दुपारी २.३० वाजता राजाराम कॉलेज येथे भेट देणार आहे. हा कार्यक्रम लोकमत युवा नेक्स्टद्वारे युवकांसाठी आयोजित करण्यात आला असून, युवा नेक्स्ट सभासदांना येथे खुला प्रवेश देण्यात येणार आहे. ‘बालक पालक’ व ‘टाईमपास’नंतर रवी जाधव प्रस्तृत व अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ हा चित्रपट असाच एक वेगळा विषय घेऊन येत आहे. तुमच्या मुलांकडे तुमेच नीट लक्ष आहे का? असा सवाल विचारणारा हा चित्रपट काय नवीन आणणार आहे, याकडे लक्ष लागलेले असतानाच चित्रपटाची टीमच भेटीला येत आहे. यावेळी रवी जाधव, पुष्कर श्रोत्री, संतोष जुवेकर, प्रवीण तरडे, आरोह वेलणकर या कलावंतांशी विद्यार्थ्यांना थेट संवाद साधता येणार आहे.
सिनेताऱ्यांशी मारा गप्पाटप्पा
By admin | Updated: August 5, 2014 00:32 IST