बायको समजून दीराने केला वहिनीचा खून, माळशिरस येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 16:09 IST2018-10-09T16:07:43+5:302018-10-09T16:09:14+5:30
खुनाचा उलगडा : खरा खुनी पोलिसांच्या ताब्यात

बायको समजून दीराने केला वहिनीचा खून, माळशिरस येथील घटना
माळशिरस : तालुक्यातील बचेरी येथील थिटे खून प्रकरणातील खºया आरोपीला रात्री उशिरा गावकºयांच्या सहकार्याने महादेव विष्णू थिटे याला अटक केली़ त्याला आज न्यायालयात हजर केले असता ११ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
यापूर्वी संशयित आरोपी म्हणून अटकेत असलेला मयताचा मुलगा संतोष थिटे याला ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी दिली आहे.
आरोपी महादेव थिटे हा शहाजी थिटे यांचा भाऊ तर मयत मंगल थिटे यांचा दीर आहे़ त्याने १ आॅक्टोबर रोजी मंगल थिटे यांचा धारदार शस्त्राने खून केला होता़ तेव्हापासून तो बेपत्ता आहे़ त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. महादेवला अटक केल्यानंतर लपवून ठेवलेली कुºहाड व कपडे मिळाले़ महादेवची पत्नी सीताबाई व मयताचा पती शहाजी यांचे अनैतिक संबंध असावे, असा महादेवला संशय होता़ यावरुन त्याचे व सीताबाईचे वारंवार भांडण होत होते. त्या भांडणातून सीताबाई माहेरी निघून गेली होती़ तिला कायमची संपवायची असा विचार करुन महादेव कुºहाड घेऊन फिरत होता़ १ आॅक्टोबर रोजी महादेव शहाजीच्या घरी आला व बाहेर झोपलेली मंगल थिटे यांना आपली पत्नी सीताबाई आहे, असे समजून वार केले, अशी कबुली महादेवने दिली. यातच मंगल थिटे जागेवर गतप्राण झाल्या़ याबाबत अधिक तपास सुरू आहे.
पोनि विश्वंभर गोल्डे, सपोनि प्रमोद सुर्वे, सुयोग वायकर, पोना विकी घाडगे, समीर पठाण, अमोल बकाल, राहुल रूपनवर, स्वप्निल गायकवाड, अभिजित मोहोळकर या पथकाने या प्रकरणाचा उलगडा केला.
सध्या संतोषला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे़ आजपर्यंत पोलीस तपासात काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर संतोषला १६९ कलमान्वये रिपोर्ट सादर करून त्याची सुटका करावी अन्यथा आरोपीला बेकायदेशीरपणे गजाआड ठेवल्याचा आरोप पोलिसांवर ठेवला जाईल़
- अॅड़ प्रवीण वाघमोडे,
संतोष थिटे यांचे वकील