अक्कलकोटजवळ कार अन् दुचाकीची धडक; एक ठार, एक गंभीर
By रवींद्र देशमुख | Updated: December 17, 2023 19:51 IST2023-12-17T19:50:53+5:302023-12-17T19:51:15+5:30
शिवाजी दगडू गायकवाड (वय ५९, रा. रामपूर, ता.द. सोलापूर) असे ठार झालेल्याचे नाव आहे.

अक्कलकोटजवळ कार अन् दुचाकीची धडक; एक ठार, एक गंभीर
सोलापूर : भरधाव वेगात निघालेल्या कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेत एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना सोलापूर-अक्कलकोट रोडवरील वळसंगजवळ घडली. शिवाजी दगडू गायकवाड (वय ५९, रा. रामपूर, ता.द. सोलापूर) असे ठार झालेल्याचे नाव आहे.
खंडू मलारी चौधरी (वय ३५, रा. दहिटणे, ता. अक्कलकोट) यानी दिलेल्या फिर्यादीनुसार नरेंद्र विठ्ठल क्षीरसागर (वय ३२, रा. नीलमनगर, सोलापूर) याच्याविरोधात वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, सोलापूर ते अक्कलकोट रोडवर न्यू वळसंग वाडा समोरील हायवेवर फिर्यादी हे एमएच १३ व्हीडी २३७७ या दुचाकीवरून वळसंग गावाकडे येत असताना पाठीमागून येणारी कार एमएच १३ डीवाय ३७९९ ने भरधाव वेगात दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत फिर्यादी हे जखमी झाले असून दुचाकीवर पाठीमागे बसलेला फिर्यादीचा मामाचा मुलगा शिवाजी हा गंभीर जखमी होऊन मयत झाला.
दुचाकी व कारच्या अपघातात मोटारसायकलचे ३ हजारांचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर कारचालक अपघाताची खबर न देता तसाच निघून गेल्याचे खंडू चौधरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद वळसंग पेालिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहायक उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.