सोलापुरात कारचा विचित्र अपघात; चार जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:48 IST2019-04-22T22:46:56+5:302019-04-22T22:48:50+5:30
सात रस्ता परिसरातील घटना; घटनेनंतर वाहतूक विस्कळीत

सोलापुरात कारचा विचित्र अपघात; चार जण गंभीर जखमी
सोलापूर : सात रस्ता परिसरात असलेल्या एका हॉटेलसमोर कारचा विचित्र अपघात झाला. या अपघातात कार चालकाने रिक्षा व दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनधारकांना उडविले. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी दहाच्या सुमारास घडली. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
सात रस्त्यावरून गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या कार क्रमांक एमएच 12 एच व्ही 74 61 या कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारला व रिक्षाला धडक देऊन रिक्षातील दोन प्रवासी व अॅक्टिवा मोटरसायकल वरील एका दुचाकीस्वरस जखमी केले. कारचालक स्वतः जखमी झाला आहे. अपघात करणाऱ्या कार चालकासह चौघे जण जखमी आहेत. उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.