बस थांबवली नाही, वाहकाला बाहेर ओढून मारहाण; दारू पिऊन धिंगाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 21:02 IST2024-05-09T21:00:18+5:302024-05-09T21:02:02+5:30

दारू पिऊन गोंधळ घालून बस एकाच ठिकाणी अर्धा तास थांबवून ठेवल्याची घटना घडली.

Bus not stopped, conductor dragged out and beaten Drunkenness | बस थांबवली नाही, वाहकाला बाहेर ओढून मारहाण; दारू पिऊन धिंगाणा

बस थांबवली नाही, वाहकाला बाहेर ओढून मारहाण; दारू पिऊन धिंगाणा

दीपक  दुपारगुडे , सोलापूर  : तुंगत (ता. पंढरपूर) येथील मोहोळ पंढरपूर लाइनवरील बस स्टॉपच्या अलीकडे न थांबल्याने एसटी वाहकाला कॉलरला धरून एसटी बसमधून खाली ओढून रस्त्यावर पाडून मारहाण केली. तसेच दारू पिऊन गोंधळ घालून बस एकाच ठिकाणी अर्धा तास थांबवून ठेवल्याची घटना घडली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुंगत (ता. पंढरपूर) येथील मोहोळ पंढरपूर लाइनवरील बसस्टॉपच्या अलीकडील बाजूस धनाजी लहू रणदिवे (वय ३०, रा. तुंगत) हा थांबून एसटी बसला हात करीत होता. परंतु बस चालकाने तेथे न थांबवता पुढे बसस्टॉपवर थांबविली. याचा राग आल्याने त्याने अरबाज युसुफ शेख ( वय ३०, रा. कडबे गल्ली) यांना शिवीगाळ करत, अंगावरील शासकीय युनिफॉर्मच्या कॉलरला धरून बसमधून खाली ओढून रस्त्यावर हाताने पाडून, हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. त्यामुळे शेख यांच्या पाठीला मुका मार लागला असून उजव्या हाताच्या कोपऱ्यास व उजव्या पायाच्या गुडघ्यास खरचटून दुखापत झाली आहे.

धनाजी रणदिवे याने साधारण अर्धा तास दारू पिऊन गोंधळ घालून बस एकाच ठिकाणी थांबवून ठेवून आम्ही करीत असलेल्या शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला आहे. म्हणून धनाजी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Bus not stopped, conductor dragged out and beaten Drunkenness