छावणीच्या ठिकाणी झुणका भाकर केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 04:24 PM2019-05-14T16:24:32+5:302019-05-14T16:24:57+5:30

रामदास आठवले करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Bunch of bread center at the camp | छावणीच्या ठिकाणी झुणका भाकर केंद्र

छावणीच्या ठिकाणी झुणका भाकर केंद्र

Next

सांगोला : चारा छावण्यांमुळे तालुक्यातील जनावरांच्या चाºयाचा व पाण्याचा प्रश्न मिटला आहे़ मात्र या छावणीच्या ठिकाणी पशुपालकांसाठी झुणका भाकर केंद्र सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

वाटंबरे येथील श्री समर्थ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या चारा छावणीला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते़ यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर बनसोडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, राजश्री नागणे यांच्यासह परिसरातील नागरिक व पशुपालक उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांची वीज बिले माफ करणे, ज्या ठिकाणी चारा छावण्या नाहीत तेथे चारा डेपो सुरू करावेत, रोजगार हमी योजनेतून शेतमजुरांच्या हाताला काम मिळावे व पशुपालक शेतकºयांच्या मागणीनुसार चारा छावणीच्या ठिकाणी झुणका भाकर केंद्र सुरू करावेत, या विषयावर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ 
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर बनसोडे यांनी नीरा उजवा योजनेतून सांगोला शाखा प्रकल्प फाटा क्रमांक ४ व ५ ला सांगोल्यासाठी मंजूर असलेले शेतकºयांच्या हक्काचे पाणी त्वरित सोडावे, अशी मागणी रामदास आठवले यांच्याकडे केली़ यावर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

विविध विषयांवर चर्चा
सततच्या दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातून चारा छावण्या व चारा डेपोची मागणी केंद्र व राज्य सरकारकडे येत असते, परंतु तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे दुष्काळी भागाला सोडण्याची तरतूद करणे, याबाबत चर्चा करू असे आठवले म्हणाले.

Web Title: Bunch of bread center at the camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.