शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

अकलूजच्या बाजारात बुलेट पेटली; वाढत्या उन्हामुळे धावपळ उडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2022 16:04 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

अकलूज : येथील शिवापुर पेठेत सामान खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाच्या बुलेट दुचाकीने उष्णतेने पेट घेतल्याने पेठेत नागरिकांची धावपळ झाली असून नागरिकांनी सावधता बाळगत पाण्याने आग विझविल्यामुळे अनर्थ टळला.

दरम्यान,  शुक्रवार २९ रोजी २ वाजण्याच्या सुमारास अकलूज शहरातील शिवापुर पेठेत खरेदीच्या निमित्ताने एक ग्राहक बुलेट या दुचाकीवरुन आला होता. त्याने केशवचंद रतुचंद फडे यांच्या बंद असलेल्या किराणा दुकानासमोर मोटारसायकल लावून खरेदीसाठी बाजारपेठेत गेला असताना उष्णतेने वायर जळाल्याने बुलेट गाडीने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केल्याने नागरिकांत गोंधळ उडाला, परंतु सर्वानी सावधानता बाळगून बुलेट गाडीवर पाणी टाकत आग अटोक्यात आणली.या बुलेट शेजारीच तीन ते चार मोटारसायकली होत्या.नागरींकांनी तत्पर आग अटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला. आग आटोक्यात आणल्यावर बुलेटच्या मालकाने मोटारसायकल टमटम मधे घालुन घेऊन गेला. सदर बुलेट गाडीला नंबर नव्हता. गडबड गोंधळात नागरिकांना मोटारसायकल मालकाचे नाव विचारता आले नाही. यासंदर्भात अकलुज पोलीस ठाण्यात संपर्क केला असता पोलीसांनी याबाबत कोणती ही खबर आली नसल्याचे सांगितले.

 

टॅग्स :SolapurसोलापूरFairजत्राmalshiras-acमाळशिरस