शेती अवजारे विक्रीचे दुकान फोडले; १८ लाखांचे ब्लोअर अन् साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:57 AM2020-06-10T11:57:31+5:302020-06-10T12:03:22+5:30

बार्शी शहरातील घटना; बंद असलेल्या दुकानाचा घेतला चोरट्यांनी फायदा

Broke down shop selling farm implements; 18 lakh blower and literature lampas | शेती अवजारे विक्रीचे दुकान फोडले; १८ लाखांचे ब्लोअर अन् साहित्य लंपास

शेती अवजारे विक्रीचे दुकान फोडले; १८ लाखांचे ब्लोअर अन् साहित्य लंपास

googlenewsNext
ठळक मुद्दे- लॉकडाऊनकाळात बार्शी शहरात चोरीचे सत्र वाढले- चोरीची घटना उघडकीस येताच वरिष्ठ अधिकाºयांनी दिली घटनास्थळाला भेट- चोरीच्या तपासासाठी पोलिसांचे विविध पथके कार्यरत

सोलापूर : बार्शी शहरातील वेअर हाऊस रोडवरील पंडीत जवाहरलाल नेहरू मार्केटमधील शेती अवजारे विक्रीचे दुकान फोडून १८ लाखांचे ब्लोअर व त्यासाठी लागणारे साहित्य अज्ञात चोरट्यांनीचोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत सादिक चांद शेख (वय ३५ रा़ मांगळे चाळ, बार्शी) यांनी बार्शी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १४ ते २७ मे या लॉकडाऊन काळात पंडीत जवाहरलाल नेहरू मार्केटमध्ये असलेले शेती अवजारे विक्रीचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले़ यातील ब्लोअर, रबरी बेल्ट, बॅटरी पंप, एसटीपी, बॅटरी पंप स्प्रे, इटालियन पंप, इटालियन जॉईन्ड, प्रेशर पाईप, ड्रागन इटालियन टँक, नोझल, पेट्रोल स्प्रे, रोटर आॅईल असा एकूण १७ लाख ८३ हजार ३६० रूपयांचा माल बंद दुकानाचे मागील बाजूस असलेले शटरचे कुलूप तोडून चोरून नेला आहे.

 याप्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार हे करीत आहेत. 


 

Web Title: Broke down shop selling farm implements; 18 lakh blower and literature lampas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.