शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

पूल कोसळू लागताच त्या दोघांनी आरडोओरडा करून थांबविली शेकडो वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 10:38 AM

दोघांच्या प्रसंगावधानामुळे वाचले अनेकांचे प्राण; उजनी कॅनॉलवरील पूल कोसळला, जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

ठळक मुद्देनवीन पूल बांधण्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून तत्काळ सुरू करण्यात आलेकालव्यास पाणी आल्यानंतर अडचण येऊ नये यासाठी सिमेंट पाईप उजनी उजव्या कालव्यावरील सदर पुलाचे काम २८ वर्षापूर्वी करण्यात आलेले होते

पंढरपूर : पंढरपूर-सातारा रस्त्यावरील उजनी उजव्या कालव्यावर असणारा सुपलीजवळील पूल धोकादायक बनलेला होता. यासंदर्भात भीमा पाटबंधारे तसेच बांधकाम विभागाला स्थानिकांकडून याबाबत कळविण्यात आले होते. मात्र, याबाबत कोणतीच कार्यवाही केली नाही. सध्या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. पर्यायी वाहतूक वेळापूरमार्गे वळवण्यात आली आहे. अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान दोन युवकांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे अनेकांचे प्राण वाचल्याची माहिती पुढे आली आहे. 

उजनी उजव्या कालव्यावरील सदर पुलाचे काम २८ वर्षापूर्वी करण्यात आलेले होते. दीड महिन्यापूर्वी पुलाखालील भिंतीची एक बाजू खचलेली होती. उजनी धरणातून पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये पूर्ण क्षमतेने कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले होते. त्यानंतर पुलासाठी बांधण्यात आलेली भिंत अधिकच कमकुवत बनली होती. या कामासाठी हलक्या प्रतिचे मटेरियल वापरण्यात आले.  बांधकामासाठी सिमेंटचा वापरही कमी प्रमाणात करण्यात आल्याचे समोर येत आहे. २८ वर्षापूर्वी बांधण्यात आलेला हा पूल अरूंद झाला आहे. 

घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार वैशाली वाघमारे, भीमा पाटबंधारे विभागाचे कोंडेकर तसेच संबंधित ठेकेदार यांनी पुलाची पाहणी केली  व पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना केली. 

सध्या ज्या मार्गावरून वाहतूक वळविण्यात आलेली होती, त्याठिकाणीच दत्त मंदिर येथील पूलही धोकादायक बनलेला आहे. त्यामुळे त्याठिकाणहून जड वाहतूक बंद ठेवण्यात आलेली असून, वेळापूर मार्गे वळविण्यात आली आहे.

आरडाओरड करुन थांबवली वाहने- रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सचिन माळी आणि अमोल घाटोळे हे दोघे तरूण पुलाच्या जवळच असणाºया बाकडांवर बसलेले होते. पूल पडल्यानंतर अचानक मोठा आवाज झाला. त्यावेळी अमोल व सचिन दोघेही पुलाच्या ठिकाणी धावून गेले व वाहने थांबविण्यास सांगितले. दोन्ही बाजूची वाहने थांबविणे सोपे नव्हते, त्यावेळी त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर आसपासची मंडळी घटनास्थळी आली. बॅरिकेड आडवे लावण्यात आले. त्यानंतर संबंधित ठेकेदाराचे वाहन त्याठिकाणी आडवे लावण्यात आले. पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तलाठी शेलार, मंडल अधिकारी मुजावर हे याठिकाणी दाखल झाले. सचिन माळी हे रात्री साडेतीन वाजेपर्यंत त्याठिकाणी थांबलेले होते.

नवीन पूल बांधण्याचे काम सुरू- रात्री कोसळलेल्या पुलाचे बांधकाम पाडून त्याठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून तत्काळ सुरू करण्यात आले आहे. कालव्यास पाणी आल्यानंतर अडचण येऊ नये यासाठी सिमेंट पाईप टाकून तात्पुरती व्यवस्था सध्या करण्यात येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरUjine Damउजनी धरण