Breaking; वाखरीत एस- टी बसची दुचाकीला धडक; एकाचा जागीच मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 09:17 IST2021-01-05T09:16:00+5:302021-01-05T09:17:12+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; Wakhrit S-T bus hits two-wheeler; One died on the spot | Breaking; वाखरीत एस- टी बसची दुचाकीला धडक; एकाचा जागीच मृत्यू 

Breaking; वाखरीत एस- टी बसची दुचाकीला धडक; एकाचा जागीच मृत्यू 

पंढरपूर : वाखरी ( ता.पंढरपूर ) येथे एका दुचाकीस्वारास धडक देऊन एस - टी बस निघून गेली. धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. 

पालखी मार्गावर वाखरी येथे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कामावर निघालेल्या दुचाकीस्वार राजू माने ( वय ५२ वर्षे, रा. वाखरी ) यास रामचंद्र पोरे यांच्या घराजवळ आले असता पंढरपूर कडून आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या विठाई बस ( क्र. एम.एच. १३, ५९९२) ने मागून धडक दिली आणि बस भरधाव निघून गेली. 

या धडकेत गंभीर जखमी झालेल्या माने यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी एस टी बसचा क्रमांक घेतला असून पोलिसांना या संदर्भात कळवण्यात आले आहे.

Web Title: Breaking; Wakhrit S-T bus hits two-wheeler; One died on the spot