Breaking; सांगोला- पंढरपूर रोडवर तिहेरी अपघात; दोन ठार, पाच जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 10:23 PM2021-01-12T22:23:53+5:302021-01-12T22:24:33+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; Triple accident on Sangola-Pandharpur road; Two killed, five seriously injured | Breaking; सांगोला- पंढरपूर रोडवर तिहेरी अपघात; दोन ठार, पाच जण गंभीर जखमी

Breaking; सांगोला- पंढरपूर रोडवर तिहेरी अपघात; दोन ठार, पाच जण गंभीर जखमी

Next

सांगोला : आयशर टेम्पो, कार आणि दुचाकी यांच्यात ओव्हरटेक करण्याच्या नादात झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीवरील अल्पवयीन मुलीसह वडिलाचा जागीच मृत्यू तर मातेसह दोन अल्पवयीन मुली व कारमधील दोघे असे पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातातील महिलेसह दोन अल्पवयीन मुलींना पुढील उपचारासाठी पंढरपूरला हलविले असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी सातच्या च्या सुमारास सांगोला- पंढरपूर रोडवरील बिलेवाडी पाटीनजीक घडला.

दरम्यान, राजेंद्र निवृत्ती शेटे (वय ४० व स्वरा राजेंद्र शेटे ०४ दोघेही रा. विजापूर गल्ली पंढरपूर) असे मृतांची नावे आहेत तर अर्चना राजेंद्र शेटे, समृद्धी राजेंद्र शेटे, नंदिनी राजेंद्र शेटे अशी जखमींची नावे असून कारमधील दोघा जखमींची नावे समजू शकली नाहीत.

याबाबत , पंढरपूर, विजापूर गल्ली येथील राजेंद्र निवृत्ती शेटे व अर्चना राजेंद्र शेटे हे पती-पत्नी मुली समृद्धी, नंदिनी व स्वरा असे पाच जण मिळून मंगळवारी सकाळी पंढरपूर येथून एमएच १२ डीके ४२४९ या दुचाकीवरून हणमंतगाव (ता. सांगोला) येथील आई सुभद्रा निवृत्ती शेटे व बहिण रेखा ज्योतिराम काळे यांना भेटण्यासाठी आले होते. तेथून आईला भेटून बहिणीचा पाहुणचार घेऊन राजेंद्र शेटे कुटुंब सायंकाळी पाचच्या सुमारास हणमंतगाव येथून सांगोलामार्गे पंढरपूरला निघाले होते. त्यांची दुचाकी पंढरपुर रोडवरील बिलेवाडी पाटीनजीक आली असता एमएच १० सीएक्स- ३८१ ही कार पंढरपूरकडून भरधाव येणा-या एमएच १० एडब्ल्यू ७६४२ या आयशर टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा तिहेरी भीषण अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता कि, राजेंद्र शेटे व स्वरा शेटे असे पिता-पुत्री दोघे जण गंभीर जखमी होवून जागीच ठार झाले तर अर्चना शेटे, समृद्धी शेटे व नंदिनी शेटे या तिघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या. कारमधील जखमी चालक व मालकाचे नाव समजू शकले नाही, नगरसेवक सतीश सावंत यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. मृत व जखमींना पोलीस नाईक तुकाराम व्हरे, हवालदार सुरेश कांबळे व बामणी येथील ठेकेदार श्रीनिवास साळुंखे यांनी स्वतःच्या वाहनातून तात्काळ उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करून मदत केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Web Title: Breaking; Triple accident on Sangola-Pandharpur road; Two killed, five seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.