Breaking; उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळमध्ये प्रेमीयुगलांची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्टी पोलिसांच्या हाती
By Appasaheb.patil | Updated: September 13, 2022 13:25 IST2022-09-13T13:25:06+5:302022-09-13T13:25:54+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळमध्ये प्रेमीयुगलांची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्टी पोलिसांच्या हाती
सोलापूर : आमचं प्रेम समाजाला मान्य नाही अशी चिठ्ठी लिहून प्रेमीयुगलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात सोमवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली.
बीबीदारफळ येथील गणेश विद्यालयात मागील वर्षीच इयत्ता १२ वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रांजली भारत सुतार व विवाहित असलेल्या वाजिद चाँद इनामदार यांनी चांदण्या घरात एका दोरीने गळफास घेतला.
या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी ७ वाजता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला मिळाली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह खाली उतरविले त्यानंतर शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी पूर्वी दोघांनीही स्वतंत्र दोन चिठ्ठ्या लिहिल्या आहेत, त्या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या असून आमचं प्रेम समाजाला मान्य नाही... आमच्या आत्महत्येला कोणासही जबाबदार धरू नये असा मजकूर चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले.