Breaking; संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 13:15 IST2021-08-08T13:13:58+5:302021-08-08T13:15:02+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; Sant Sahityache Gadhe Abhyasak Pvt. Dr. Narendra Kunte passes away | Breaking; संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांचे निधन

Breaking; संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांचे निधन

सोलापूर : संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांचे रविवारी सकाळी दहा वाजता सोलापूर येथे दुःखद निधन झाले. दयानंद महाविद्यालयात मराठीचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

पू गुरुदेव रानडे परिवारातील ते ज्ञानवंत साधक होते. तरुण वयात त्यांनी अनेक दैनिकात काही काळ नोकरी केली होती. संत साहित्य, संत चरित्रे ह्यावर त्यांनी विविध दैनिकातून विपुल लेखन केले आहे.

अध्यात्मिक विषयांवरील त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले होते. संत साहित्य सेवा संघातर्फे त्यांचा पुरुषोत्तम सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता तसेच अन्य मानाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला होता. प्रा डॉ नरेंद्र कुंटे सरांच्या निधनाने संत साहित्याचा एक श्रेष्ठ अभ्यासक आपण सर्वांनी गमावला आहे.

Web Title: Breaking; Sant Sahityache Gadhe Abhyasak Pvt. Dr. Narendra Kunte passes away