Breaking; मोहोळजवळ खासगी बसचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2022 10:53 IST2022-04-22T10:53:02+5:302022-04-22T10:53:24+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; मोहोळजवळ खासगी बसचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
सोलापूर/ मोहोळ : सोलापूर - पुणे महामार्गावरील मोहोळजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास खासगी बस व जीपचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अन्य प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळजवळील सारोळे पाटीजवळ खासगी बस व जीपची समोरासमोर धडक झाली. खासगी बस ही पंढरपूरहून मोहोळकडे येत होती, तर खासगी प्रवासी वाहतूक करणारी जीप ही मोहोळहून पंढरपूरकडे जात होती. यावेळी दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना गाड्यांमधून बाहेर काढून सुखरूपपणे पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात विचित्र होता.