Breaking; सोलापुरातील भाजपचे माजी नगरसेवक बाबुराव घुगे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 09:25 IST2021-04-09T09:24:52+5:302021-04-09T09:25:51+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; सोलापुरातील भाजपचे माजी नगरसेवक बाबुराव घुगे यांचे निधन
सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे माजी नगसेवक शिवशंकर उर्फ बाबुराव घुगे (वय 65) यांचे आकस्मित निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, अजित आणि मयुर ही दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. घुगे यांना कोरोनाची बाधा झाली होती, उपचार घेऊन ते बरे झाले होते. गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले. आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता मोदी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 2005 साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक म्हणून घुगे यांची ओळख होती. सध्या त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. सोबतच हुंडेकरी असोसिएशनचे सचिव म्हणून ते काम पाहत होते.