Breaking; ऊस बिलासाठी 'गोकुळ' साखर कारखान्याच्या चिमणीवर चढून शेतकऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 11:22 IST2020-09-14T11:21:42+5:302020-09-14T11:22:15+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; ऊस बिलासाठी 'गोकुळ' साखर कारखान्याच्या चिमणीवर चढून शेतकऱ्यांचे आंदोलन
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरने मागील गळीत हंगामात ऊस पुरवलेल्या शेतकऱ्यांना बिलाच्या रकमा तातडीने द्याव्यात या मागणीसाठी युगंधर संघटनेचे पदाधिकारी आज सकाळी कारखान्याच्या चिमणीवर चढून आंदोलन करीत आहेत.
दरम्यान, संघटनेने आठ सप्टेंबर रोजी साखर आयुक्तांना याबाबतचे पत्र देऊन १३ सप्टेंबर पर्यंत ऊस बिले दिली नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, मुदत संपताच आज सकाळी संघटनेचे कार्यकर्ते हे कारखान्यावर जाऊन आंदोलन करीत आहेत.