शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Breaking; उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक आवर्तन सोडण्यास मान्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 17:09 IST

 पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

सोलापूर : जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक आवर्तन सोडण्यास मान्यता देण्यात आली असून 28 जानेवारी 2022 पाणी सोडण्यात येणार आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

बैठक गुगल मीट ॲपद्वारे ऑनलाईन घेण्यात आली. बैठकीला आमदार सर्वश्री बबनराव शिंदे, संजय शिंदे, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह.तु. धुमाळ, अधीक्षक अभियंता आणि प्रशासक डी.बी. साळे, उजनी धरण व्यवस्थापकचे कार्यकारी अभियंता आर.पी. मोरे, भीमा विकास विभागचे कार्यकारी अभियंता आर.एन. क्षीरसागर यांच्यासह पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील कालवा सल्लागार समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे यांनी सर्व लोकप्रतिनिधींच्या समस्या, मागण्या ऐकून घेतल्या. भरणे यांनी सांगितले की, 28 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत डावा आणि उजव्या कालव्यातून पाच टीएमसी तर भीमा-सीना जोड कालव्यातून दीड टीएमसी पाणी सोडण्यास मान्यता देण्यात आली. दहिगाव उपसा सिंचनसाठी 2 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत 0.15 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. आमदार बबनराव शिंदे यांनी सीना-माढा प्रकल्पाला मार्चच्या पुढे पाणी सोडण्यास सांगितल्याने त्याला मान्यता देण्यात आली आहे. 

रब्बी हंगामात गाळ वजा जाता एकूण पाणीसाठा 120.34 टीएमसी तर उपयुक्त 56.68 टीएमसी साठा आहे. याची टक्केवारी 85.06 इतकी आहे. पहिल्या आवर्तनात 6.65 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. यामध्ये सीना-माढा प्रकल्पाला मार्चनंतर पाणी सोडण्यात येणार आहे.

बैठकीत उन्हाळ हंगामाचेही नियोजन करण्यात आले. उन्हाळ हंगामासाठी दोन आवर्तन असून यामध्ये पहिल्या आवर्तनामध्ये 16.90 टीएमसी तर दुसऱ्या आवर्तनात 17.90 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. यामध्ये कालवा, नदी, जोडकालवा, उपसा सिंचन योजनांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली. 

शिवाय भीमा नदीला मागणी, परिस्थिती, पाणी साठ्याच्या उपलब्धेनुसार 25 फेब्रुवारी 2022 नंतर पाणी सोडण्यात येणार आहे. उजनी धरणात मार्चअखेर गाळ वजा जाता संभाव्य उपयुक्त पाणीसाठा 106.74 टीएमसी आहे. पाणी नियोजनाचे सादरीकरण श्री. साळे यांनी केले.

  • 1 मार्च 2022 अखेर संभाव्य पाणी वापर 
  • बाष्पीभवन-पाच टीएमसी
  • जलाशय उपसा सिंचन-4.50 टीएमसी
  • जलाशय बिगर सिंचन (पिण्यासाठी)-0.85 टीएमसी
  • जलाशय बिगर सिंचन (औद्योगिक)-0.55 टीएमसी

 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकPoliticsराजकारणagricultureशेती