Breaking; कुर्डूवाडी बायपासवरील पंढरपूर चौकात अपघात; चौघेजण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 14:33 IST2020-10-31T14:32:59+5:302020-10-31T14:33:46+5:30

छोटा हत्ती व कारमध्ये झाली समोरासमोर जोराची धडक

Breaking; Accident at Pandharpur Chowk on Kurduwadi Bypass; Four were seriously injured | Breaking; कुर्डूवाडी बायपासवरील पंढरपूर चौकात अपघात; चौघेजण गंभीर जखमी

Breaking; कुर्डूवाडी बायपासवरील पंढरपूर चौकात अपघात; चौघेजण गंभीर जखमी

कुर्डूवाडी : कुर्डूवाडी बायपासवरील पंढरपूर चौकात मोडनिंबकडून वळून कुर्डु गावाकडे निघालेल्या मॅजिक छोटा हत्ती (एमएच-२५, एजे- २५१९) व बारामतीकडून बार्शीकडे निघालेली कार (एम एच १२ एफ के ४७०१) यांच्यामध्ये समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात दोन्ही गाडीतील चौंघेजण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी दुपारी एक वाजता घडली आहे. त्यात छोटा हत्ती मॅजिक गाडीतील दोघे जखमी गंभीर आहेत. 

दरम्यान, छोटा हत्ती मॅजिकमध्ये चालक म्हणून बाळू जालंदर सौदाळ ( वय- ३५,रा, वाघेगव्हाण ता. परांडा) व कल्याण एकनाथ चव्हाण ( वय, ६५, रा लव्हे, ता. माढा ) यांचा समावेश आहे. कारमधील अजित सुभाष गोरे (वय, ३०, रा बारामती) व संदीप सुनिल म्हेत्रे (वय,२५, रा. डोलेर्वाडी ता. बारामती ) यांचा समावेश आहे. अपघातानंतर लगेच नागरिक अपघातस्थळी पोहचले व रस्त्यावरून खाली पलटी झालेला छोटा हत्ती उचलून त्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांना काढण्यास मदत केली.

अपघातात दोन्ही गाड्याचा नुकसान झाले आहे. अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची दोन किलोमीटर अंतरावर राग लागली होती. अपघातानंतर  वाहतूक शाखेच्या महिला पोलीस नाईक एफ.एस.कस्तुरे, पोलीस कॉन्स्टेबल सागर सुरवसे, महिला पोलीस मेघना आगावणे यांनी येऊन वाहतुक सुरळीत केली व जखमींना मदत केली. अपघातातील जखमींना सौरभ परबत, राहुल ठेंगल, प्रवीण ठेंगल, राजू अस्वरे, नवनाथ माने, चिंटू गाडे, पप्पू तांबोळी, सिद्धेश्वर पन्हाळकर, वाघमारे या युवकांनी मदत केली़ सर्व जखमींना कुर्डूवाडीतील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

Web Title: Breaking; Accident at Pandharpur Chowk on Kurduwadi Bypass; Four were seriously injured