Breaking; शेततळयात बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 11:07 IST2020-11-03T11:06:57+5:302020-11-03T11:07:28+5:30
दोन महिन्यांत पाण्यात बुडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

Breaking; शेततळयात बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील शेततळयात बुडून एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. दरम्यान दोन महिन्यांत शेततळ्यात व अतिवृष्टीच्या पाण्यात बुडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दामाजी उर्फ पवन नामदेव अवघडे (वय १६ रा. साठे नगर, मंगळवेढा) हा त्याचे मामा अशोक भगवान कांबळे यांच्या शेततळयातील पाण्यात २ नोव्हेंबर रोजी दुपारी १.१५ च्या सुमारास पडून बुडून मयत झाला. याची खबर बसवंत कांबळे यांनी मंगळवेढा पोलिसात नोंदविली असून अधिक तपास तुकाराम कोळी हे करीत आहेत.