A bomber kills the prisoner while shooting a broom | झाडू मारता मारता जेलमधून कैद्याने ठोकली धूम
झाडू मारता मारता जेलमधून कैद्याने ठोकली धूम

ठळक मुद्देमगदूम मेहबूब मुजावर (रा. अभय नगर, सावरकर चौक, सांगली) असे पळून गेलेल्या आरोपीचे नावमगदूम मुजावर याच्यावर पत्नीने कौटुंबिक प्रतिबंधक कायद्यान्वये खटला दाखल केला होताघरगुती हिंसाचार कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यात तो शिक्षा भोगत होता

सोलापूर : जेलमध्ये दिलेले काम करीत असताना झाडू मारता मारता एका कैद्याने जेलमधून धूम ठोकली, हा प्रकार सोमवारी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे अधिकारी व कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. 

मगदूम मेहबूब मुजावर (रा. अभय नगर, सावरकर चौक, सांगली) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. मगदूम मुजावर याच्यावर पत्नीने कौटुंबिक प्रतिबंधक कायद्यान्वये खटला दाखल केला होता. घरगुती हिंसाचार कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यात तो शिक्षा भोगत होता. 

जेलमध्ये कैद्यांना दररोज कामे लावली जातात. मगदूम मुजावर याला झाडू मारण्याचे काम सांगण्यात आले होते. इतर आरोपींप्रमाणे तो जेलच्या बाहेरील परिसरात झाडू मारत होता. झाडू मारता मारता तो कारागृहातील रखवालदाराची नजर चुकवून पळून गेला. या प्रकरणी जिल्हा कारागृहाचे शिपाई चंद्रकांत देवप्पा दळवे (वय ४६) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास पोलीस नाईक म्हेत्रे करीत आहेत. 
 


Web Title: A bomber kills the prisoner while shooting a broom
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.