शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कोरोनामुळे भारतीय संस्कृतीची आठवण...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 11:55 IST

कोरोना विषाणूमुळे होणाºया कोविड-१९ या आजाराने भयभीत करून सोडले आहे.

ठळक मुद्दे चला तर या कोरोना विषाणूच्या निमित्तानं का होईना आपणा सर्वांना आपल्या भारतीय संस्कृतीची आठवण झाली भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टींचे आपण जर व्यवस्थित आचरण केले तर भविष्यकाळात येणाºया अशा अनेक विषाणूंवर आपण मात करू

मागील दोन ते तीन आठवड्यांपासून आपणा सर्वांना कोरोना विषाणूमुळे होणाºया कोविड-१९ या आजाराने भयभीत करून सोडले आहे. मला खात्री आहे की लवकरच या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रतिबंधक लसाची आणि त्यावरील उपचारासाठी लागणाºया औषधांचा शोध होऊन त्याची निर्मिती सुरू होईल आणि सर्व काही सुरळीत होईल.

 जसं प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे माझ्या दृष्टीने या कोरोना विषाणूने त्याचे दोन्ही बाजू आपणास दाखविल्या आहेत. एका बाजूने तो जरी आपणास शाप ठरत असताना, त्याची दुसरी बाजूही पाहणे अत्यंत गरजेचे आहे. मी त्या दोन्ही बाजूंचा विचार करूनच हा लेख लिहित आहे. मागील तीन आठवडे मी जेव्हा या भयानक कोरोना विषाणूवर विचार करीत आहे तेव्हा मला अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. त्यापैकी मी काही गोष्टी मांडत आहे. या कोरोना विषाणूने मात्र जगातील सर्व मनुष्यजातीला काही प्रचंड शिक्षा आणि शिकवण व बºयाच गोष्टींची आठवण करून दिली आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. 

या कोरोना विषाणूमुळे आपली भारतीय संस्कृती किती थोर आणि महान आहे याची प्रचिती पावलोपावली येत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा कोरोना विषाणू आपणास बाहेरून घरात आल्यानंतर हात आणि पाय स्वच्छ धुवायला भाग पाडत आहे. वापरलेले कपडे व्यवस्थित खुंटीवर ठेवण्यास भाग पाडत आहे. जेव्हा दोन व्यक्ती भेटतात तेव्हा त्यांना दोन्ही हात जोडून नमन करण्यासाठी नमस्कार करावयास भाग पाडत आहे. दोन व्यक्तींमध्ये संभाषण चालू असताना त्यांच्यात एक मीटरचे सुरक्षित अंतर ठेवण्यास भाग पाडत आहे. स्वत:चे, घरातील आणि परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. आपल्या भारतातील काही समाजातील लोक तोंडावर मास्क लावून बोलत असतात, या मास्कचे महत्त्व यानिमित्ताने पुढे येत आहे.

या कोरोना विषाणूमुळे जनतेला स्वत:हून जनता कर्फ्यू पाळून घरात बसवण्यास भाग पाडत आहे. घरातील व्यक्तींशी सुसंवाद करण्यासाठी भाग पाडत आहे. कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र बसून जेवत आहेत, एकत्र बसून स्वत:च्या कुटुंबातील भूतकाळातील अनेक महत्त्वाचे प्रसंग, सुख-दु:खाच्या, मंगलदायी, गमतीजमती यांची उजळणी करावयास भाग पाडत आहे. ज्यांचे आरोग्य कमकुवत आहे त्यांना त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यास भाग पाडत आहे. प्रत्येकास नित्यनियमाने दररोज व्यायाम करण्यास भाग पाडत आहे़ बºयाच व्यक्तींना घरातील खरी परिस्थिती जाणवून देत आहे. गमतीनं का होईना सर्व पुरुष मंडळींना घरात स्त्रियांना मदत करण्यास भाग पाडत आहे. या वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यास प्रामुख्याने एका गोष्टीची मात्र आठवण होते, ती म्हणजे आपण विसरत जात असलेली आपली भारतीय महान संस्कृती आणि तिचे महत्त्व.

 या विषाणूने जगातील सर्व मानवजातीला निसर्गाचे महत्त्व पटवून दिले तर आहेच त्याचप्रमाणे निसर्गातील प्रत्येक घटकाबद्दल आदर आणि प्रेम याची भावनासुद्धा निर्माण केली आहे. जो निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध जातो त्यासाठी निसर्ग त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान करतो, हे मात्र सर्वांनाच पटले आहे.

 दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटी प्रत्येक व्यक्तीला पैशांच्या हिशोबाचा ताळमेळ ठेवणे हे अनिवार्य असते आणि तो ठेवतो. त्याच पद्धतीनं हा मार्च-२०२० मात्र आपल्याला निरोगी राहण्यासाठी उत्तम आचरण, स्वच्छता, सवयी, शिस्त आणि व्यवहार या गोष्टींच्या हिशोबाचा ताळमेळ ठेवण्यास भाग पाडले आहे. या विषाणूंवर जेव्हा आपण मात करू त्यानंतरसुद्धा अजून कुठल्या नवीन विषाणूच्या हल्ल्याची वाट पाहण्यापेक्षा आपण सर्वांनी घरात मागील तीन-चार दिवसांत ज्या पद्धतीचे आचरण, सवयी, शिस्त आणि व्यवहार घरात करत आहोत तो कायमचा ठेवला तर भविष्यकाळात आपण कुठल्याही विषाणूंवर किंवा आजारांवर नक्की विजय मिळवू, एवढी मला खात्री आहे.

 चला तर या कोरोना विषाणूच्या निमित्तानं का होईना आपणा सर्वांना आपल्या भारतीय संस्कृतीची आठवण झाली असेलच. भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टींचे आपण जर व्यवस्थित आचरण केले तर भविष्यकाळात येणाºया अशा अनेक विषाणूंवर आपण मात करू. आपल्या भारतातील अनेक संतांनी अनेक वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या त्यांच्या ओव्यांमध्ये भविष्यकाळात विषाणूंच्या हल्ल्याबाबत उल्लेख केला होता आणि याची प्रचिती आपणा सर्वांना येत आहे. आपली भारतीय संस्कृती इतकी सुंदर आणि थोर आहे की त्याचे महत्त्व सर्व पाश्चात्य देशांना पटले असून्६ा, ते त्याचे आचरण करीत आहेत आणि नेमके उलटे भारतातील अनेक लोक हे पाश्चात्य संस्कृतीकडे झुकलेले दिसतात. आपण सर्वजण आपल्या भारतीय संस्कृतीचे पालन करून घरातील बालगोपाळांनासुद्धा त्याचे महत्त्व पटवून द्या. वरील सर्व मुद्यांचा विचार करून आपणच ठरवायचे आहे कोरोना विषाणू हा आपल्या समाजाला शाप आहे की वरदान ? - डॉ. व्यंकटेश मेतन(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ, निसर्गमित्र आहेत़) 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस