भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश, सोलापूरचा राजकारणात खळबळ
By राकेश कदम | Updated: May 21, 2023 13:58 IST2023-05-21T13:57:42+5:302023-05-21T13:58:02+5:30
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील हुतात्मा स्मृती मंदिरात काॅंग्रेसचा निर्धार मेळावा झाला. या मेळाव्यात प्रा. निंबर्गी यांनी प्रवेश केला.

भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश, सोलापूरचा राजकारणात खळबळ
भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला.
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील हुतात्मा स्मृती मंदिरात काॅंग्रेसचा निर्धार मेळावा झाला. या मेळाव्यात प्रा. निंबर्गी यांनी प्रवेश केला. प्रा. निंबर्गी हे जनसंघाच्या काळापासून पक्षात सक्रिय होते. पक्षाने त्यांच्या नेतृत्वाखाली दोन विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.
भाजपच्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील गटबाजीला वैतागून आपण भाजपला रामराम ठोकत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आगामी काळात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्ष सोडतील असा दावा निंबर्गी यांनी केला.