शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात भाजपचा जल्लोष; महापौरपदी श्रीकांचना यन्नम; उपमहापौरपदी राजेश काळे

By appasaheb.patil | Updated: December 4, 2019 16:11 IST

श्रीकांचना यन्नम यांच्या रूपातून पद्मशाली समाजाला आठव्यांदा महापौर पदाची संधी मिळाली तर यन्नम या पद्मशाली समाजातील पहिल्या महिला महापौर ठरल्या.

ठळक मुद्दे- महापालिकेच्या सभागृहात झाली महापौरपदाची निवडणूक- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवडणुक निर्णय अधिकाºयाचे काम पाहिले- महापौर निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पार्टीच्या श्रीकांचना यन्नम तर उपमहापौरपदीभाजपाचेच राजेश काळे विजयी झाले. श्रीकांचना यन्नम यांच्या रूपातून पद्मशाली समाजाला आठव्यांदा महापौर पदाची संधी मिळाली तर यन्नम या पद्मशाली समाजातील पहिल्या महिला महापौर ठरल्या. निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आवारात एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, हलग्यांचा कडकडाटाने परिसर दुमदुमुन गेला होता. 

सोलापूर महापालिकेत बुधवारी महापौर व उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडली़ निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी काम पाहिले़ महापौरपदासाठी श्रीकांचना यन्नम यांचा सामना एमआयएम पक्षाच्या शहाजीदाबानो शेख यांच्याशी झाला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच बहुजन वंचित आघाडी अशा एकूण ३९ सदस्यांनी निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली़ यन्नम यांना ५१ तर शेख यांना ०८ मते मिळाली़ त्यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश वायचळ यांनी महापौरपदी श्रीकांचना यन्नम या विजयी झाल्याचे घोषित केले.

महापौर निवडीनंतर उपमहापौर पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली़ उपमहापौर पदासाठी एकूण ०९ अर्ज आले होते़ अंतिम सामना भाजपाचे राजेश काळे, काँग्रेसच्या फिरदोस पटेल आणि एमआयएमच्या तस्लिम शेख यांच्यात झाला़ शिवसेनेत या मतदानावेळी फाटाफुट दिसली. गुरूशांत धुत्तरगांवकर आणि देवेंद्र कोठे यांनी मतदानात भाग घेतला नाही़ उर्वरित सेना नगरसेवकांनी काँग्रेस उमेदवारास मतदान केलं. राजेश काळे यांना ५०, फिरदोस पटेल यांना ३४ तर तस्लिमा शेख यांना ८ मतं मिळाली़ १६ मतांनी राजेश काळे विजयी झाले़ वंचितचे तीन आणि माकपचा एक सदस्य तटस्थ राहिला. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाMayorमहापौरBJPभाजपाVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख