सोलापूर जिल्ह्यातील अकरा पैकी दहा पंचायत समितीवर भाजपाचा सभापती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:27 IST2026-03-12T15:27:40+5:302026-03-12T15:27:40+5:30
सभापती पदावर भाजपचे वर्चस्व असले तरी उपसभापती पदाच्या वाटपात वैविध्य दिसून येते.

सोलापूर जिल्ह्यातील अकरा पैकी दहा पंचायत समितीवर भाजपाचा सभापती
आप्पासाहेब पाटील
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीची निवडणूक प्रक्रिया गुरूवारी पार पडली. दरम्यान, यात भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केला आहे. जिल्ह्यातील ११ पैकी १० पंचायत समितीमध्ये भाजपाचे सभापती विजयी झाले आहेत. तर केवळ एका जागेवर शिवसेनेला यश मिळाले आहे.
या निवडणुकीत भाजपने सुरुवातीपासूनच आपली रणनीती चोख ठेवली होती. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, माढा आणि करमाळा या १० तालुक्यांत भाजपचे सभापती विराजमान झाले आहेत. माळशिरसमध्ये मात्र शिवसेनेच्या दत्ता मगर यांनी सभापतीपद पटकावत शिवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. या निवडीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना मिळालेले प्रतिनिधित्व. जिल्ह्यातील ११ पैकी ६ तालुक्यांचे नेतृत्व महिला सभापतींकडे सोपवण्यात आले आहे. उत्तर सोलापूर (तेजस्विनी बोराडे), अक्कलकोट (रश्मी हिप्परगी), बार्शी (मिनाक्षी रोंगे), मंगळवेढा (दिपाली ताड), सांगोला (पुनम इंगवले) आणि करमाळा (पुजा ढेरे) या ठिकाणी महिलांनी बाजी मारली आहे. सोलापूरच्या ग्रामीण राजकारणात भाजपने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महिलांना मिळालेले झुकते माप पाहता, आगामी काळात ग्रामीण विकासाच्या कामात महिलांचा सहभाग लक्षणीय ठरेल, अशी चिन्हे आहेत.
सभापती पदावर भाजपचे वर्चस्व असले तरी उपसभापती पदाच्या वाटपात वैविध्य दिसून येते. येथे भाजपने ६ जागा राखल्या आहेत, तर उर्वरित ५ जागांवर शिवसेना (१), राष्ट्रवादी शरद पवार गट (२), राष्ट्रवादी अजित पवार गट (१) आणि एका अपक्ष उमेदवाराला संधी मिळाली आहे. हे चित्र पाहता स्थानिक पातळीवर सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्याचे स्पष्ट होते.
तालुकानिहाय सभापती व उपसभापती
उत्तर सोलापूर
सभापती-सौ.तेजस्विनी बोराडे,भाजप
उपसभापती -सुनिल भोसले,भाजप
दक्षिण सोलापूर
सभापती-संदीप टेळे, भाजप
उपसभापती -सौ.वर्षा पटणे,भाजप
अक्कलकोट
सभापती -रश्मी हिप्परगी भाजप
उपसभापती - सागर कल्याणशेट्टी, भाजप
बार्शी
सभापती-मिनाक्षी रोंगे,भाजप
उपसभापती -संतोष निंबाळकर,भाजप
मोहोळ
सभापती -अल्लम चौधरी,भाजप
उपसभापती -उल्का पाटील,भाजप
मंगळवेढा
सभापती -दिपाली ताड भाजप
उपसभापती-अर्जन मल्लाळे,भाजप
सांगोला
सभापती -पुनम इंगवले,भाजप
उपसभापती -अजय सरगर, शिवसेना
पंढरपूर
सभापती-डॉ.शुभम आगवणे,भाजप
उपसभापती -प्रमोद देशमुख, राष्ट्रवादी
माढा
सभापती-पंडीतराव देशमुख,भाजप
उपसभापती -स्वाती गिड्डे,अपक्ष
माळशिरस
सभापती-दत्ता मगर, शिवसेना
उपसभापती -सोनाली पाटील, राष्ट्रवादी श.प.
करमाळा
सभापती -पुजा ढेरे, भाजप
उपसभापती -अजित विध्ने, राष्ट्रवादी अ.प.