अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By शीतलकुमार कांबळे | Updated: June 6, 2023 18:17 IST2023-06-06T18:16:41+5:302023-06-06T18:17:03+5:30

शीतलकुमार कांबळे सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठाळे ते वैराग येथील सासुरे फाटा येथे जात असताना चार चाकी वाहनाने ...

Bike rider killed in collision with unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठाळे ते वैराग येथील सासुरे फाटा येथे जात असताना चार चाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली यात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला ही घटना सोमवार पाच जून रोजी 3.30 च्या सुमारास घडली.

चंद्रहार निवृत्ती साबळे (वय 70 रा. कवठाळे तालुका उत्तर सोलापूर) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोहन बळी गायकवाड (वय 55) हे दोघे दुचाकीवरून सोमवारी दुपारी 3.30 वाजता वैराग परिसरातील सासरे फाटा येथे जात कामानिमित्त होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीला पाठीमागून अज्ञात चार चाकी वाहनाच्या चालकाने धडक दिली. यात चंद्रहार व मोहन असे दोघे खाली पडून जखमी झाले. 

या अपघाताची खबर मिळताच अमोल गायकवाड यांनी सायंकाळी 5:30 च्या सुमारास दोघांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारात दाखल केले. रात्री नऊच्या सुमारास उपचारादरम्यान चंद्रहार हे मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे.
 

Web Title: Bike rider killed in collision with unknown vehicle