मोठी बातमी; दोन लाखाची लाच स्वीकारताना सोलापूर पोलीस दलातील कर्मचाऱ्यास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 08:42 IST2021-01-09T08:38:04+5:302021-01-09T08:42:23+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; While accepting a bribe of Rs 2 lakh, a Solapur police officer was caught | मोठी बातमी; दोन लाखाची लाच स्वीकारताना सोलापूर पोलीस दलातील कर्मचाऱ्यास पकडले

मोठी बातमी; दोन लाखाची लाच स्वीकारताना सोलापूर पोलीस दलातील कर्मचाऱ्यास पकडले

सोलापूर : जुगाराच्या दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी न पडण्यासाठी दोन लाखाची लाचेची मागणी करून ती स्वीकारताना सोलापूर शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचारी व एका खासगी व्यक्तीला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

गणपतसिंग मोहनसिंग चव्हाण (वय 38 वर्षे, पद -पोना/373 नेमणूक. सदर बझार पोलीस स्टेशन अंकित - सदर बझार,पोलीस चौकी, सोलापूर शहर) व धीरजकुमार पांडुरंग शिवशरण (वय -34 वर्षे) असे लाच स्वीकारलेल्या दोघांची नावे आहेत. 

याबाबत हकीकत अशी की, यातील तक्रारदार यांचे मित्रावर जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी आरोपी क्रमांक १ चव्हाण यांनी 2,00,000/- रुपये लाच मागणी करून, खाजगी इसम आरोपी क्रमांक 2 धीरजकुमार  शिवशरण याचे मार्फत 2,00,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारताना असता रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस उपनिरीक्षक जगदीश भोपळे, पोलीस निरीक्षक रशीद बाणेवाले, श्रीराम घुगे सनी वाघमारे यांनी केली आहे. 

Web Title: Big news; While accepting a bribe of Rs 2 lakh, a Solapur police officer was caught