मोठी बातमी; उद्या शहरातील १८ केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:01 PM2021-05-09T16:01:09+5:302021-05-09T16:02:02+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; Tomorrow, people between the ages of 18 and 44 will be vaccinated at 18 centers in the city | मोठी बातमी; उद्या शहरातील १८ केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस मिळणार

मोठी बातमी; उद्या शहरातील १८ केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस मिळणार

Next

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने  सर्व आरोग्य केंद्रावरती 45 वर्षापुढील लोकांसाठी लसीकरण सुरू असून शासनाकडून वेळोवेळी लस महापालिकेकडे उपलब्ध होतात पण 45 वर्षापुढील लोकांसाठी शासना कडून अद्याप लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण करण्यात येणार नाही. पण 18 ते 44 वर्षाच्या लोकांसाठी महापालिकेकडे सद्या 2500 लस उपलब्ध असल्याने.

विशेष करून 10 मे 2021 रोजी एक दिवसासाठी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या 18 नागरी आरोग्य केंद्रावरती लस दिली जाणार आहे.

दरम्यान,  त्यासाठी आज 9 मे 2021 रोजी सायंकाळी 7 ते 8 या दरम्यान रजिस्ट्रेशन करण्यासाठी साईट उपलब्ध करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आज रजिस्ट्रेशन करावे. आणि उद्या नागरिक आरोग्य केंद्र येथे लसीकरणासाठी यावे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेला आहे त्यांनीच  आरोग्य केंद्रावरती लसीसाठी यावेत ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले नाही त्यांनी लसीकरण केंद्र जवळ येऊ नये याची नागरिकांनी नोंद घ्यावी. उद्यापासून सर्व लसीकरण केंद्र येथील 45 वर्षाच्या पुढील व्यक्तींसाठी लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहेत.

ज्यावेळी  शासनाकडून लस उपलब्ध होईल त्यावेळी प्रसार माध्यमं त्याद्वारे नागरिकांना कळवण्यात येईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिली.

Web Title: Big news; Tomorrow, people between the ages of 18 and 44 will be vaccinated at 18 centers in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.