मोठी बातमी; टेंभुर्णीजवळ पोलिसांच्या व्हॅनला टेम्पोची धडक; सहा पोलिस कर्मचारी जखमी

By Appasaheb.patil | Updated: October 7, 2022 12:09 IST2022-10-07T12:09:07+5:302022-10-07T12:09:10+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

big news; Tempo hits police van near Tembhurni; Six police personnel injured | मोठी बातमी; टेंभुर्णीजवळ पोलिसांच्या व्हॅनला टेम्पोची धडक; सहा पोलिस कर्मचारी जखमी

मोठी बातमी; टेंभुर्णीजवळ पोलिसांच्या व्हॅनला टेम्पोची धडक; सहा पोलिस कर्मचारी जखमी

सोलापूरसोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास शिराळा पाटीजवळ पोलिसांची व्हॅन व टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात सहा पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती टेंभुर्णी पोलिसांनी लोकमत शी बोलताना दिली. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार मध्यरात्री  एकच्या सुमारास सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णीजवळील शिराळा पाटीजवळ सोलापूर शहर पोलिसांची बीडीडीएस गाडी नंबर एमएच १३ सीयू ०७३३ ही पुण्याहून सोलापूरकडे येत असताना पाठीमागून सोलापूरकडे येत असलेला टेम्पो एमएच ४३ बीपी ९५५१ या गाडीने पोलिसांच्या व्हॅनला जोराची धडक दिली. या धडकेत सहा पोलिस कर्मचारी व एक श्वान जखमी झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या पेालिसांवर टेंभुर्णी येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  पोलीस नाईक चुंगे, पोलीस कॉन्स्टेबल रोकडे, शिंदे, सावंत, पोलीस नाईक गवळी, बंडदाळ असे जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत. 

या अपघातानंतर टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या अधिकारी, अंमलदार यांनी तात्काळ अपघातस्थळावर पोहोचून जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी लोकमत शी बोलताना दिली. 

Web Title: big news; Tempo hits police van near Tembhurni; Six police personnel injured