Breaking; वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसली; सात वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
By Appasaheb.patil | Updated: October 31, 2022 22:00 IST2022-10-31T19:32:19+5:302022-10-31T22:00:16+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसली; सात वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर : सोमवारी सायंकाळी पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार ( MH-13 DE -7938) घुसून झालेल्या अपघातात जठारवाडी (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर पाच वारकरी जखमी झाले.
हा अपघात सांगोला-मिरज रोडवर जुनोनी गावाजवळ सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान घडला. याबाबत सांगोला पोलिसात नोंद झाली आहे. अपघातात पाच महिला आणि दोन पुरुष वारकऱ्यांचा समावेश आहे. शारदा आनंदा घोडके, सुशीला पवार, गौरव पवार, सरामराव श्रीपती जाधव, सुनिता सुभाष काटे, शांताबाई सुभाष जाधव आणि रंजना बळवंत जाधव (सर्व रा. जठारवाडी ता करवीर). जखमी वारकरी असे, अनिता गोपीनाथ जगदाळे (वय 60), अनिता सरदार जाधव (वय 55), सरिता अरुण सियेकर (वय 45), शानुताई विलास सियेकर (वय 35) आणि सुभाष केशव काटे (वय 67) सर्व रा. जठारवाडी. तर तुकाराम दामु काशिद रा.सोनंद ता सांगोला असे चालकाचे नाव आहे.