मोठी बातमी; सोलापूरच्या जावयाने खरेदी केली राजस्थान रॉयल्स आयपीएल टीम; मोजले १५३०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 11:48 IST2026-04-05T11:47:15+5:302026-04-05T11:48:13+5:30

आयपीएलची टीम राजस्थान रॉयल्स १५३०० कोटी रुपयांना खरेदी करणारे कैलाश नंदकिशोर सोमाणी हे सोलापूरचे जावई

big news son in law of solapur nandkishore somani buys rajasthan royals IPL team estimated at 15300 crore | मोठी बातमी; सोलापूरच्या जावयाने खरेदी केली राजस्थान रॉयल्स आयपीएल टीम; मोजले १५३०० कोटी

मोठी बातमी; सोलापूरच्या जावयाने खरेदी केली राजस्थान रॉयल्स आयपीएल टीम; मोजले १५३०० कोटी

सोलापूरआयपीएल स्पर्धा ही जगभरातील सर्वोत्तम खेळाडू, वेगवान टी २० फॉरमॅट, सेलिब्रिटी मालक आणि थरारक सामन्यांमुळे क्रिकेट चाहत्यांचे मुख्य आकर्षण आहे. जगातील अव्वल क्रिकेटपटू एकाच मंचावर, वेगवेगळ्या संघांतून खेळताना दिसतात. कमी वेळेत जास्त थरार आणि रोमांचक सामने पाहण्याचा आनंद अनेकांना आहे. चित्रपट आणि उद्योग जगतातील दिग्गज अनेक संघांशी जोडलेले असल्याने त्याला ग्लॅमर मोठे आहे. अशातच राजस्थान रॉयल्स टीमचा मालक कोण याबाबतची चर्चाही सध्या वेगाने सुरू झाली आहे. 

आयपीएलची टीम राजस्थान रॉयल्स १५३०० कोटी रुपयांना खरेदी करणारे कैलाश नंदकिशोर सोमाणी हे सोलापूरचे जावई असून, त्यांच्या पत्नी वर्षा या सोलापुरातील मूळच्या सारडा घराण्यातील आहेत. आपली मुलगी वर्षा आणि जावई कैलाश यांनी राजस्थान रॉयल्स टीम विकत घेतल्यानंतर सम्राट चौकात राहणाऱ्या सारडा कुटुंबीयाने आनंद व्यक्त केला. वर्षा सारडा या स्वातंत्र्यसैनिक मुरलीधरजी सारडा यांच्या नात आहेत. दीपक सारडा हे त्यांचे वडील तर हीरा सारडा या आई आहेत. वर्षा यांचा विवाह २००१ साली कैलाश (कॅल) सोमाणी यांच्यासोबत झाला आणि त्यानंतर त्या अमेरिकेतील स्कॉटस्डेल येथे स्थायिक झाल्या. वर्षा यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण आणि कुटुंबीय मूल्यांचा संगम साधत त्यांनी परदेशातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वर्षा यांना अर्जुन आणि सानिया ही दोन मुले आहेत. मुलगा अर्जुन हा गोल्फ खेळाडू असून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करत आहे. मूळ वाशीम येथील रहिवासी तसेच अमेरिकेत स्थायिक झालेले कैलाश (कॅल) सोमाणी यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघ खरेदी केल्याची बातमी समोर आली असून, या व्यवहारामुळे वाशीमसोबत सोलापूर जिल्ह्याचा अभिमान जागतिक पातळीवर झळकला आहे.

क्रिकेटची आवड अन् गरीबांना करतात मदत...

९० च्या दशकात वाशीममध्ये शिक्षण घेतलेल्या सोमाणी यांनी लहानपणापासून क्रिकेटची आवड जोपासली. वडील नंदकिशोर सोमाणी यांच्या निधनानंतर वयाच्या केवळ १५ व्या वर्षी त्यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. लहानपणातील संघर्षातून पुढे जात त्यांनी शिक्षण पूर्ण करून व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि आज ते अमेरिकेतील यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. कैलाश सोमाणी हे संगणक अभियंता असून, अमेरिकेतील आयोव्हा राज्यात त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या कंपनीत १२०० कर्मचारी आहेत. त्यांना क्रिकेटची आवड आहे. वाशिममध्ये त्यांनी अकोला-नागपूर रस्त्यावर क्रिकेट अकॅडमी तयार केली आहे. त्याशिवाय गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी एक कोटी रुपयांची मदत केली आहे.

Web Title : सोलापुर के दामाद ने 15300 करोड़ में खरीदी राजस्थान रॉयल्स आईपीएल टीम

Web Summary : सोलापुर के दामाद, कैलाश सोमानी ने 15300 करोड़ रुपये में राजस्थान रॉयल्स आईपीएल टीम खरीदी। उनकी पत्नी, वर्षा, सोलापुर से हैं। मूल रूप से वाशिम के रहने वाले और अमेरिका में बसे सोमानी एक सफल व्यवसायी हैं, जिन्हें क्रिकेट और परोपकार का शौक है।

Web Title : Solapur's Son-in-Law Buys Rajasthan Royals IPL Team for ₹15300 Crore

Web Summary : Solapur's son-in-law, Kailash Somani, purchased the Rajasthan Royals IPL team for ₹15300 crore. His wife, Varsha, is from Solapur. Somani, originally from Washim and settled in America, is a successful businessman with a passion for cricket and philanthropy.