मोठी बातमी; ५० हजाराची लाच स्वीकारताना सोलापुरातील पोलीस अधिकारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2022 15:20 IST2022-03-08T15:19:54+5:302022-03-08T15:20:02+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; Solapur police officer arrested for accepting bribe of Rs 50,000 | मोठी बातमी; ५० हजाराची लाच स्वीकारताना सोलापुरातील पोलीस अधिकारी अटकेत

मोठी बातमी; ५० हजाराची लाच स्वीकारताना सोलापुरातील पोलीस अधिकारी अटकेत

सोलापूर : गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक लाखाची लाच मागून 50 हजार रुपये स्वीकारताना सोलापूर शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षकास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. 

दरम्यान,  जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश श्रीकांत कुलकर्णी असे लाच घेणारे पोलीस अधिकारी आहेत.  यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. यातील आरोपी लोकसेवक यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल मार्गदर्शन अधिकारी करण्याची कार्यवाही सुरु आहे.

Web Title: Big news; Solapur police officer arrested for accepting bribe of Rs 50,000