मोठी बातमी; सोलापूर विधानपरिषद निवडणुकीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 21:30 IST2021-11-09T21:30:09+5:302021-11-09T21:30:14+5:30
नगराध्यक्ष, नगरसेवक एकत्र येणार; उद्या विश्रामगृहात बैठक

मोठी बातमी; सोलापूर विधानपरिषद निवडणुकीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
मंगळवेढा : सोलापूर विधानपरिषद निवडणूक बाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक याना सोबत घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप यांनी दिली.
निवडणूक आयोगाला सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालया कडून चुकीची माहिती सादर करण्यात आली आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संख्या ही ७५ टक्के पेक्षा जास्त कार्यरत असतानाही अपुऱ्या महितीच्या आधारे अपेक्षित संख्या नसल्याचे दाखवण्यात आलेले आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील विधानपरिषद जागेचे निवडणूक वगळून राज्यातील सर्व निवडणूक घेण्याचे ठरवण्यात आले आहे. ते चुकीचे आहे यासंदर्भात उद्या बुधवार दि.१० नोव्हेंबर रोजी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीत जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विविध मुद्यावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणूक अधिकारी यांच्या निर्णया विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अजित जगताप यांनी दिली.