मोठी बातमी; संदीप पवार खून प्रकरण; पुण्यातील 'सरजी' गँगचा राईट हॅण्ड सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 09:51 AM2021-08-28T09:51:34+5:302021-08-28T09:52:00+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; Sandeep Pawar murder case; Right hand of 'Sarji' gang found in Pune | मोठी बातमी; संदीप पवार खून प्रकरण; पुण्यातील 'सरजी' गँगचा राईट हॅण्ड सापडला

मोठी बातमी; संदीप पवार खून प्रकरण; पुण्यातील 'सरजी' गँगचा राईट हॅण्ड सापडला

googlenewsNext

पंढरपूर : पुणे विभागामध्ये सरजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गॅंगमधील सरजीचा राईट हॅण्ड सुनील वाघ याला पंढरपूर पोलिसांनी मैसूर येथून शुक्रवारी ताब्यात घेतले आहे.

पंढरपुरातील नगरसेवक संदीप पवार यांचा २०१८ रोजी  स्टेशन रोडवरील श्रीराम हॉटेल मध्ये बंदुकीने गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी २४ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र सुनील वाघ हा तेव्हापासून फरार होता. त्याचा शोध घेण्याचे काम पोलिस मागील पाच वर्षापासून करत होते. 

तो कर्नाटकातील म्हैसूर येथे नाव बदलून राहत असल्याची माहिती पोलिस सूत्रांना मिळाली. शुक्रवारी सुनील भागवत सचिन देवमारे या दोघांना पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पंढरपूर उपविभागीय पोलिस अधीक्षक विक्रम कदम, पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र मगदुम, पोहेकॉ शरद कदम, सुरज हेंबाडे, राजेश गोसावी, पोकॉ सुनिल बनसोडे, सुजित जाधव, विनोद पाटील यांनी केली आहे.

Web Title: Big news; Sandeep Pawar murder case; Right hand of 'Sarji' gang found in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.