मोठी बातमी; मुळेगाव तांड्यावर धाड; १४ ठिकाणच्या छाप्यात १३ लाखांची दारू नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 16:11 IST2021-01-09T16:11:23+5:302021-01-09T16:11:28+5:30

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंची कारवाई; ; १४ जणांवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Big news; Raid on Mulegaon Tanda; 13 lakh liquor destroyed in raids at 14 places | मोठी बातमी; मुळेगाव तांड्यावर धाड; १४ ठिकाणच्या छाप्यात १३ लाखांची दारू नष्ट

मोठी बातमी; मुळेगाव तांड्यावर धाड; १४ ठिकाणच्या छाप्यात १३ लाखांची दारू नष्ट

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील  मुळेगाव तांडा येथील हातभट्टी दारू तयार होणाऱ्या १४ ठिकाणी छापा टाकून १२  लाख ३९ हजार २०० रुपयाचाची दारू नष्ट करून १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

सोलापूर ग्रामीण दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी अवैध व्यवसायांवर कारवाईची विशेष मोहीम राबवून प्रत्यक्ष सहभाग घेऊन आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी सकाळी तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मुळेगाव तांडा  येथे कारवाई केली. यापुढेही सोलापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या अवैद्य धंद्यावर कारवाई सुरू राहणार असून संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. 


सदरच्या कामगिरीमध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष सहभागात पोलीस उपविभागीय अधिकारी प्रभाकर शिंदे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुहास जगताप,पोलीस निरीक्षक फुगे, सपोनि काजळकर सपोनि बंडगर, तावरे, दळवी,इंगळे पिंगवाले, महिला शिपाई गोडबोले, तसेच ग्रामीणचे आरसीबी पथक, क्यू आर टी पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारांनी या कारवाईत भाग घेतला.

Web Title: Big news; Raid on Mulegaon Tanda; 13 lakh liquor destroyed in raids at 14 places