मोठा बातमी; पैशाच्या कारणावरून मटका घेणाऱ्याचा खून; सोलापुरातील घटना

By Appasaheb.patil | Updated: September 21, 2022 11:26 IST2022-09-21T11:26:51+5:302022-09-21T11:26:58+5:30

गळा आवळून धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

big news; Murder of a matka taker for money; Incident in Solapur | मोठा बातमी; पैशाच्या कारणावरून मटका घेणाऱ्याचा खून; सोलापुरातील घटना

मोठा बातमी; पैशाच्या कारणावरून मटका घेणाऱ्याचा खून; सोलापुरातील घटना

सोलापूर : पैशाच्या कारणावरून मटका घेणाऱ्या एका व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना सोलापूर-मुळेगाव रोडवरील केकडे नगरात घडली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ही घटना बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

महादेव नारायणकर (वय ३५, रा. केकडे नगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की,  केकडे नगरातील रहिवाशी कोकणे यांच्या घरात नारायणकर हे भाड्याने राहत होते. बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घरात झोपले असता त्यांच्या मोबाईलवर फोन आला. तेव्हा ते उठून घराबाहेर गेले. त्याच दरम्यान अनोळखी व्यक्तीने त्याचा गळा आवळला व धारदार शस्त्राने गळा कापून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तेव्हा पती कुठे गेले हे पाहण्यासाठी पत्नी घराबाहेर आल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. याचवेळी गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त प्रिती टिपरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

 

Web Title: big news; Murder of a matka taker for money; Incident in Solapur