मोठी बातमी; कुर्डूवाडीत शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत हॉटेलसह सात दुकाने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 10:13 AM2021-04-23T10:13:04+5:302021-04-23T10:13:28+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; In Kurduwadi, seven shops, including a hotel, were gutted in a fire caused by a short circuit | मोठी बातमी; कुर्डूवाडीत शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत हॉटेलसह सात दुकाने जळून खाक

मोठी बातमी; कुर्डूवाडीत शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत हॉटेलसह सात दुकाने जळून खाक

Next

 लक्ष्मण कांबळे/ कुर्डूवाडी


 कुर्डूवाडी (भोसरे हद्द) येथील उपविभागीय महावितरण कार्यालयासमोरील असणाऱ्या दोन हॉटेलसह एकूण वेगवेगळ्या प्रकारच्या सात दुकानांना विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागल्याने संपुर्ण दुकाने जळून त्यात खाक झाली आहेत. यामध्ये सर्वांचे मिळून सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लागलेली आग इतकी भीषण होती की त्याला विझविण्यासाठी येथील नगरपालिका व विठ्ठल कारखान्याच्या दोन अग्निशमन दलाच्या गाड्यांना अर्धा तास वेळ लागला.


  या शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत राहुल माने व सिद्धेश्वर गवळी यांची दोन वेगवेगळी हॉटेल, ढेरे यांचे टेलरिंगचे दुकान,तन्वीरचे पंक्चरचे दुकान, काशीदचे सलूनचे दुकान, एक सायकल दुकान व अजून एका दुकानाचा समावेश म्हणजे एकूण सात दुकानांचा समावेश आहे. या सगळ्या दुकानातील साहित्याची अक्षरशः जळून राख झालेली आहे. लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी पोलिसांना फोनद्वारे घटना सांगितली. त्यावेळी लागलीच पोलीस तिथे पोहचले तोपर्यंत नगरपालिका यंत्रणेकडील अग्निशमन दलाच्या जवानांनी एक गाडी आणून आग विजविण्यास सुरुवात केली. तोपर्यंत विठ्ठल कारखान्याकडील अग्निशमन दलाच्या जवानांनी ही एक गाडी घेऊन येत त्यास मदत केली. त्यावेळी संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात मदत झाली. घटनास्थळी पोलिसांनी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली असून घटना नेमकी कशी घडली याचा तपास ते करीत आहेत.

Web Title: Big news; In Kurduwadi, seven shops, including a hotel, were gutted in a fire caused by a short circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.