शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; पंढरपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २९१९ जणांना मिळणार कोरोनाचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 17:39 IST

पंढरपूर : पंढरपुर तालुक्यात आरोग्य सेवा पुरवणाºया २९१९ जणांना पहिल्या टप्प्यात कोरोनाचे लसीकरण होणार आहे. त्यासाठी पंढरपूर आरोग्य विभागाकडे ...

पंढरपूर : पंढरपुर तालुक्यात आरोग्य सेवा पुरवणाºया २९१९ जणांना पहिल्या टप्प्यात कोरोनाचे लसीकरण होणार आहे. त्यासाठी पंढरपूर आरोग्य विभागाकडे प्रथम टप्प्यात १६१० डोस उपलब्ध झाले आहे. शनिवारपासून रोज १०० व्यक्तींना कोरोनाचे लसीचे डोस उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दिले जाणार असल्याचे प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

कोविडअ‍ॅपवर यादी संकलित करण्यात आली आहे. आरोग्य सेवेशी संबंधित १०० जणांना  लस देण्यात येणार आहे.  लस देण्यात येणाºया लाभार्थ्यांला  रजिस्टर मोबाईल नंबरवरती  एक दिवस अगोदर वेळ व ठिकाणची माहिती देणारा संदेश येणार आहे.  यासाठी संबधितांनी नोंदणी करताना जे ओळखपत्र जोडले आहे ते घेवन यावे. लाभार्थी  लसीकरण कक्षात आल्यानंतर त्यांची  माहिती घेतल्यानंतरच त्याना लसीकरण केले जाणार आहे. कोविड लस ही २  ते ८ डिग्री सेल्सीअस तापमाणात लस ठेवावी लागते. यामुळे लस ठेवण्यासाठी रेफ्रीजेटरची व्यवस्था उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे करण्यात आली.

आरोग्य विभागाने लसीकरणाच्या ठिकाणी  लसीकरण कक्ष, निरिक्षण कक्ष तसेच रुग्णवाहिका सेवा सुसज्ज  ठेवण्याबाबत दक्षता घ्यावी. तसेच आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवाव्यात अशा सूचनाही  सचिन ढोले यांनी यावेळी दिल्या.

  ◼️भीती अथवा गैरसमज बाळगू नये 

लसीकरण केल्यानंतर संबधितांना तज्ञ डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली अर्धा तास निरिक्षण कक्षात ठेवण्यात येणार आहे. लाभार्थी लसीकरण करुन घरी आल्यानंतरही त्यांना काही त्रास झाल्यास उपचार देण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने समिती स्थापन करण्यात आली आहे.यामध्ये शासकीय व खाजगी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबधितावर तज्ञ डॉकटरांकडून तात्काळ उपचार केले जाणार आहेत. याबाबत कोणतीही  भीती अथवा गैरसमज बाळगू नये असे आवाहनही डॉ. एकनाथ बोधले व डॉ. अरविंद गिराम यांनी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरCorona vaccineकोरोनाची लस