मोठी बातमी; सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अटकेत; जाणून घ्या कारण ?

By Appasaheb.patil | Updated: October 31, 2022 18:57 IST2022-10-31T18:54:11+5:302022-10-31T18:57:04+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

big news; Education officer of Solapur Zilla Parishad arrested; Know the reason? | मोठी बातमी; सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अटकेत; जाणून घ्या कारण ?

मोठी बातमी; सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अटकेत; जाणून घ्या कारण ?

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाच घेतल्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापुरातील पथकाने सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका संस्थेकडे शासकीय काम करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी पैशांची मागणी केली. तक्रारदार व्यक्ती आणि शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यात तडजोडी झाली. त्यानंतर लोहार यांनी पंचवीस हजार रुपये स्वीकारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तक्रार आल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी सोलापूर जिल्हा परिषदेत सापळा लावला होता. तक्रारदार व्यक्तीकडून २६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना रंगेहात पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

Web Title: big news; Education officer of Solapur Zilla Parishad arrested; Know the reason?