मोठी बातमी; सोलापुरातील बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 14:07 IST2020-10-02T14:07:30+5:302020-10-02T14:07:36+5:30

विजापूर नाका पोलिसांची कारवाई; 

Big news; Destroyed counter for printing counterfeit notes in Solapur | मोठी बातमी; सोलापुरातील बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा उद्ध्वस्त

मोठी बातमी; सोलापुरातील बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा उद्ध्वस्त

सोलापूर: बनावट नोटा छापणाºया दोन तरुणांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोन तरुणांकडून घरी बनावट नोटा प्रिंटर आदी साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी झाली. त्या दोघांनी आतापर्यंत किती बनावट नोटा छापल्या आणि त्यांनी या नोटा कोणाकोणाला सप्लाय केल्या याबाबतची अधिक माहिती पोलिस घेत आहेत.

विष्णू सिद्राम गायधनकर ( वय ३५,रा. भारत हौसिंग सोसायटी सदर बाजार सोलापूर,) व संजय धनु पवार ( वय ३५, रा. कुमठा तांडा उत्तर सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी शंभर रुपयाच्या ६१० व पाचशे रुपयाच्या ५०० नोटा अशा एकूण १११० नोटा कारवाईदरम्यान जप्त केल्या आहेत. तसेच नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

Web Title: Big news; Destroyed counter for printing counterfeit notes in Solapur