शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

मोठी बातमी; मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावातील नुकसानीच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 8:24 AM

तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक अशा  १०१ कर्मचाऱ्यांनी कंबर कसली

मंगळवेढा /मल्लिकार्जुन देशमुखे 

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावातील अतिवृष्टीने व महापुराने नुकसान झालेल्या पिकाचे व पडलेल्या घराचे पंचनामे करण्याचे  काम तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक असे  १०१ कर्मचाऱ्यांवतीने  युद्धपातळीवर सुरू आहे . शेतकऱ्यांनी गावनिहाय नेमणुक केलेल्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केले आहे.जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आता बाधीत क्षेत्राचे पंचनामे  करण्यासंदर्भात महसूल खात्याने तातडीने पावले उचलली असून मंगळवेढा, भोसे, मरवडे, आंधळगाव,मारापुर, बोराळे ,हुलजंती या सात महसूल मंडलसाठी हे कर्मचारी नियुक्त करण्यात आले. यामध्ये  यु व्ही सूर्यवंशी, के एस मलाबदी, सी.बी.कांबळे,जी.एम.जगताप (मंगळवेढा), सी.ए बनसोडे (माचणूर), एन.एल.कल्ले (रहाटेवाडी), एन एस काझी (तामदर्डी), व्ही.बी.केंजळे, एस.बी. शिंदे (ब्रह्मपुरी), जे.वाय.मुलाणी (बठाण), पी.पी पुजारी ए.पी घुले (उचेठाण), एम.व्ही.उबाळे(पाठखळ), बी.आर.आठराबुध्दे (गणेशवाडी), एस एच कुंभार (मेटकरवाडी) आर.आर. बेशकराव ,एन बी पाटील (डोणज), एन एम कुलकर्णी (भालेवाडी), डी एम पवार (डोंगरगाव),डी.बी. पवार (कचरेवाडी), एम.डी वाघमोडे, जी.जे.भागवत, जे.पी पांडे (मरवडे) बी.एस.पाटील,मंगेश लासूरकर (तळसंगी), व्ही.एन. सूर्यवंशी (खोमनाळ) बी.डी कोळी (फटेवाडी),एस.एन. फुलारी(भाळवणी) बी.बी. भोसले (हिवरगाव),ए.एस. पाटील (येड्राव),भारत चंदनशिवे (जित्ती)राहूल कांबळे(डिकसळ),खोंडे (निंबोणी),युन्नुस फुलारी, समाधान वगरे(चिक्कलगी), पी.बी. ढोबळे, एस.एस.गावडे (आंधळगाव), ए.एस.चव्हाण, जे.एन.गायकवाड (नंदेश्वर),टी. एस.सावंत(जुनोनी), आर.पी.इंगळे, डी.डी.करे (गोणेवाडी), एन,के, पवार, एम.टी भोसले (खुपसंगी), एम.पी संकपाळ (लेंडवेचिंचाळे), एम.पी.जुंदळे (हाजापूर) एस.डी.लेंडवे (शिरसी), ए.ए.लाड,(जालीहाळ), एस.बी,शेख (खडकी), पी.पी.कोळी, एम.जी.पवार (मारापूर) ए.डी. जिरापुरे (शेलेवाडी),पी.एस.भोरकडे,जी.एस नलावडे (अकोले),लोखंडे,डी.ए. इंगोले,व्हि.एच.भोई,(लक्ष्मी दहिवडी),डी.ए. स्वामी(गुंजेगाव), टी.के. कांबळे, एम एस गायकवाड(महमदाबाद शे.) वंदना गुप्ता (मल्लेवाडी), एच.एल.शिंदे (ढवळस), राखी जाधव(देगाव) एम.ओ.कवाळे(मुढवी), श्रीकांत ठेंगील (धर्मगाव), प्रशांत काटे, ए.टी.कोळेकर(हुलजंती), एस माने (माळेवाडी), पी.व्ही.भितकर (सोड्डी), आर.एस.गायकवाड (शिवणगी), ए.डी.चलावादी(येळगी), बी.बी.राठोड, गणेश गवळी(सलगर बु), आर.एल. खोमणे (सलगर खु,), बी.डी.काटे(आसबेवाडी), बी.एस. माने (बावची), एस.आर.जामगौंड(पौट),पी. एस. चव्हाण(जंगलगी), ए.बी. इंगळे घोळवे,(लवंगी),जयश्री कल्लाळे,राजकुमार ढेपे (भोसे), राजाराम रायभान,डी.जी.विरनक (शिरनांदगी), ए.एस. शिंदे, एन एच मौलवी(हुन्नुर), एम एस.गावडे, डी.टी.मुठेकर(मानेवाडी), एस.के. इनामदार (रेवेवाडी)आर.बी.चव्हाण, पी.एस. शिवशरण(रड्डे), एम.एन.फराटे(सिध्दनकेरी),डी.बी. मोरे(लोणार), ए.यु.खवसे (पडोळकरवाडी), ए.टी.लिगाडे (मारोळी), चौधरी (महमदाबाद हु), विजय शिंदे,अरूण मोरे (बोराळे) एस.आर.कडलासकर, पी.पी पाटील (मुंढेवाडी), ए.यु. मोरे (सिध्दापूर), व्ही.बी. भोजने (तांडोर), व्ही.ए.लिगाडे, एस.आर.नळे(अरळी), विजय एकतपुरे, (कागष्ट) बी.डी.भोजने(कात्राळ), विजय एकतपुरे,(कर्जाळ),व्हि.के.भोजने (लमांणतांडा), आर.डी.बागल(नंदूर)--रेड्डे च्या तलाठ्याकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा...

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या दरम्यान रेड्डे येथे बहुतांशी शेतकऱ्यांनी बाजरी सह जे काही थोड्या प्रमाणात वाचलेले पीक बाजूला काढण्याचा प्रयत्न केला मात्र महसूल चे काही बहाद्दर तलाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक काढण्याचा प्रयत्न केला त्यांचे पंचनामे करणार नाही त्यांना नुकसान भरपाई दिली जाणार नाही असा अजब फतवा काढला आहे या  मनमानी कारभाराणे शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे.आम्ही काढलेले पीक तसेच आहे ते पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेऊन जावे पण आमचा पंचनामा करावा अशी विनवणी करत आहे.मात्र काही कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा  होत असून जिल्हाधिकारी यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून कामचुकार तलाठी सह कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी रेड्डेचे शेतकरी सुनील लोखंडे यांनी केली आहे.

मंडलनिहाय पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी व कृषी पर्यवेक्षक यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. काहीही अडचण असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. बाधित नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत.  - स्वप्नील रावडे ,तहसीलदार मंगळवेढा

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय