मोठी बातमी; सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर अपघात; एक ठार, सहा प्रवासी जखमी
By Appasaheb.patil | Updated: September 12, 2022 12:01 IST2022-09-12T11:56:34+5:302022-09-12T12:01:09+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मोठी बातमी; सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर अपघात; एक ठार, सहा प्रवासी जखमी
सोलापूर : सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील लिंबीचिंचोळी (ता.द.सोलापूर) गावाच्या परिसरात सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातील खासगी बस उलटून झालेल्या अपघातात एक ठार तर सहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती वळसंग पोलिसांनी लोकमत शी बोलताना दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन कर्नाटकातील भाविक पहाटेच्या सुमारास सोलापूरकडे येत होते. वळसंग गावाहून लिंबीचिंचोळी हद्दीत गाडी येत असताना पुलावरील डिव्हायडरवर चढल्याने अपघात झाला. याचवेळी चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर वळसंग पोलिस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. बसमधील जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती अशी माहिती पोलिसांनी दिली.