शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

भीमा कारखाना निवडणूक मतमोजणी; दोन्ही गटाकडून चुरशीची लढत, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 17:07 IST

पुळूज ऊस उत्पादक गटात महाडिक गटाचे विश्वराज महाडिक यांना ५८२६ , बिभीषण वाघ याना ५६२१ मते मिळाली आहेत तर विरोधी भीमा बचाव परिवर्तन पॅनेलचे उमेदवार देवानंद गुंड यांना २१७७ , कल्याणराव पाटील यांना २२२९ मते मिळाली.

सोलापूर/कुरुल - राजकीय दृष्टया महत्वाची समजली जाणारी भीमा सहकारी साखर कारखान्यांच्या मतमोजणी सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून काडादी मंगल कार्यालयात सुरू झाली. यात भीमा सहकारी साखर कारखाना पहिल्या फेरीचा निकाल अधिकृतपणे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी जाहीर केला.

पुळूज ऊस उत्पादक गटात महाडिक गटाचे विश्वराज महाडिक यांना ५८२६ , बिभीषण वाघ याना ५६२१ मते मिळाली आहेत तर विरोधी भीमा बचाव परिवर्तन पॅनेलचे उमेदवार देवानंद गुंड यांना २१७७ , कल्याणराव पाटील यांना २२२९ मते मिळाली. संस्था गटात खासदार धनंजय महाडिक यांना ४३ पैकी ३१ मते मिळून विजयी घोषित करण्यात आले. विरोधी गटातील राजेंद्र चव्हाण यांना १२ मते मिळाली आहेत. टाकळी सिकंदर ऊस उत्पादक गटात महाडिक गटाचे संभाजी चव्हाण यांना  ५८१०, सुनील चव्हाण यांना ५८२२ मते मिळाली आहेत तर भीमा बचाव पॅनलच्या शिवाजी भोसले यांना २२५० तर राजाराम माने यांना २१५३ मते मिळाली आहेत.

सुस्ते ऊस उत्पादक गटात महाडिक गटाचे तात्या नागटीळक यांना ५७९५ , संतोष सावंत याना ५५३७ मते मिळाली आहेत तर बचाव पॅनलच्या पंकज नायकोडे याना २१९९ आणि विठ्ठल रणदिवे याना २१३३ मते मिळाली आहेत. अंकोली ऊस उत्पादक गटात महाडिक गटाचे सतिश जगताप यांना ५७०३ , गणपत पुदे यांना ५५५७ मते मिळाली आहेत तर बचाव पॅनलचे भारत पवार यांना २१७६ ,रघुनाथ सुरवसे यांना २०५२ मते मिळाली आहेत. 

कोन्हेरी ऊस उत्पादक गटात महाडिक गटाचे राजेंद्र टेकळे यांना ५७६६ तर बचाव पॅनलचे कुमार गोडसे यांना २४१६ मते मिळाली आहेत. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात  महाडिक गटाचे बाळासाहेब गवळी यांना ५७७५ तर बचाव पॅनलच्या भारत सुतकर यांना २२७५ मते मिळाली आहेत. महिला राखीव मतदारसंघात महाडीक गटाच्या सिंधू चंद्रसेन जाधव यांना ५८६१ , प्रतीक्षा बाबुराव शिंदे यांना ५७०९ मते मिळाली आहेत तर बचाव गटाच्या अर्चना दिलीप घाडगे याना २२३० , सुहासिनी शिवाजी चव्हाण यांना २१९२ मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत महाडिक गटाने विरोधी भीमा बचाव परिवर्तन पॅनल वर सरासरी ३६०० मताधिक्य घेतले आहे. दुसऱ्या फेरीतील मतमोजणी सुरू झाली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणElectionनिवडणूक