शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

सोलापुरात भजन आंदोलन; पारंपारिक दिंडी अन् पालख्यांना आषाढीत परवानगी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 12:18 PM

आषाढीवारीसाठी वारकरी मंडळा कडून भजन आंदोलन

सोलापूर - आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येण्यासाठी किमान 50 भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी आणि  संबंधित निर्णय बदलून सहकार्य करावे अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्यावतीने सोलापूर येथील जिल्हा परिषद गेटसमोर भजन आंदोलन करून देण्यात आले.  यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, बळीराम जांभळे, ज्योतीराम चांगभले, संजय पवार, अविनाश पवार, कुमार गायकवाड, किशोर धायगुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सोलापूर : वारकरी परंपरेमध्ये " पंढरीची वारी जयाची ये कुळी | त्याची पाय धुळी लागो मज || " या उक्ती प्रमाणे वारी विषयी धारणा खूपच मोठी असून नित्य नेमाला खूप मोठे महत्व आहे. तो नेम निष्ठेने सांभाळला जातो. वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व वारी, रामनवमी, बीज, हनुमान जयंती, गणेशोत्सव, नवरात्र हे सर्व उत्सव शासन सूचना स्वीकारून साजरे केले. महामारी कोरोनामुळे कुणीही शासन विरोधात भूमिका  घेतली नाही. शासनाला आत्ता पर्यंत सहकार्यच केले. मागील वर्षी परिस्थिती वेगळी होती. केंद्र व राज्य दोन्ही सरकारचे निर्बंध होते.आत्ता फक्त राज्य शासन निर्बंध आहेत. शिवाय सध्या रुग्ण संख्या ही खूप कमी होत आहे. त्यामुळे आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येण्यासाठी किमान 50 भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

टॅग्स :SolapurसोलापूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर