Breaking: सोलापूर जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी दिलीप माने यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 16:34 IST2020-09-02T16:16:48+5:302020-09-02T16:34:56+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Beraking; Dilip Mane as the Chairman of Solapur District Milk Association | Breaking: सोलापूर जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी दिलीप माने यांची निवड

Breaking: सोलापूर जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी दिलीप माने यांची निवड

सोलापूर: अपेक्षेप्रमाणे सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदी माजी आमदार दिलीपराव माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

बुधवारी जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था ( दूध) सुनील शिरापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. चेअरमन निवडीसाठी चर्चा करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, दिलीप सोपल, दिपक साळुंखे, राजन पाटील, आमदार संजयमामा शिंदे, बबनराव आवताडे यांची बैठक झाली. या बैठकी अगोदरच आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार दिलीपराव माने यांची नावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुचविली होती. आमदार संजय शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून मी संघासाठी वेळ देऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर पवार यांनी माने यांना चेअरमन करण्यास सुचविले. 

संघाच्या संचालकांशी चर्चा केल्यानंतर माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दुपारी अडीच वाजता संघाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत एकमताने माने यांची निवड करण्यात आली.

Web Title: Beraking; Dilip Mane as the Chairman of Solapur District Milk Association