कोर्टातील केस मागे घे म्हणत विळ्याने मारहाण

By दिपक दुपारगुडे | Updated: May 30, 2023 19:05 IST2023-05-30T19:04:42+5:302023-05-30T19:05:08+5:30

कोर्टातील केस काढून घे म्हणत शिवीगाळ करत हातातील विळ्याने मारून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला.

Beating with a sickle saying to withdraw the court case | कोर्टातील केस मागे घे म्हणत विळ्याने मारहाण

कोर्टातील केस मागे घे म्हणत विळ्याने मारहाण

सोलापूर : कोर्टातील केस काढून घे म्हणत शिवीगाळ करत हातातील विळ्याने मारून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. ही घटना २९ मे रोजी रा.१.३० वा. सुमारास माढा तालुक्यात महादेववाडी येथे घडली. या प्रकरणी कुर्डूवाडी पोलिसांनी भागवत दऱ्याबा मोटे (रा. महादेववाडी, ता. माढा) यांच्या फिर्यादीवरून जिवराज लिंबा मोटे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, तानाजी जिवराज मोटे (रा. महादेववाडी, ता. माढा) यांनी २००२ साली फिर्यादीच्या नावावरील अज्ञान पालन जमीन खरेदी केलेली होती. त्याचा वाद कोर्टात चालू आहे.

दरम्यान २९ रोजी रा.१.३० वा सुमारास फिर्यादी हे शेतात उसाची दारे धरण्यासाठी गेला असता तिथे जिवराज लिंबा मोठे हा आला आणि फिर्यादीला शिवीगाळ करत कोर्टातील केस काढून घे म्हणाला आणि त्याच्या हातातील विळ्याने फिर्यादीच्या पायावर, मांडीवर मारून जखमी केले. कोर्टातील केस मागे घेतली नाही तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
 

Web Title: Beating with a sickle saying to withdraw the court case